आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरावरील भ्याड हल्याचा येवलात निषेध  

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरावरील भ्याड हल्याचा येवलात निषेध  

सय्यद कौसर येवला / कोपरगाव विशेष प्रतिनिधी  – तालुक्यातील नगरसूल येथे कोविड १९ उपचारा दरम्यान एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत डॉक्टरांवर दगडफेकी प्रयत्न केला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरावरील भ्याड हल्याचा निषेध करीत आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी संरक्षणार्थ उपाय योजना करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी प्रांताधिकारी सोपान कासार व तहसिलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोमवारी रात्री डिसीएचसी नगरसूल येथे एक ६२ वर्षीय महिला कोविड १९ उपचारा दरम्यान दगावली आहे. या महिला रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराने ग्रस्त होती. या रुग्णाची ऍन्जीओप्लास्टी सुद्धा झालेली होती. सदर रुग्णेवर आयसीएमआरच्या नियमानुसार योग्य पद्धतीने उपचार सुरु होते. परंतु तिला श्‍वसनास त्रास वाढु लागल्यामुळे डॉक्टरांनी ऑक्सिजन सह सर्व इर्मजन्सी औषधोपचार अत्यंत तातडीने केले. परंतु दुर्दवाने उपचारा दरम्यान सदर रुग्ण दगावला. रुग्ण दगावल्याची बातमी समजताच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी डीएचसी आवारात लोकांचा जमाव गोळा करुन डॉक्टरांना शिवीगाळ केली व डॉक्टरांवर प्राणघातक दगडफेकीचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात वैद्यकीय अधिकारी साहेबराव मदनुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड हे थोडक्यात बचावले आहे.
संपूर्ण जगावर आलेल्या कोविड विषानुच्या संकटात स्वत:च्या जीवाची, परीवाराची कुठलीही काळजी न करता रात्रंदिवस कोवीड रुग्णांवर उपचार करुन त्यांचा जीव वाचविणारे देवदुत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचेवर असा हल्ला होणे हे अत्यंत निदंनीय आहे. अशा घटनांमुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे माणसीक खच्चीकरण होईल व त्यांना आरोग्य सेवा देण्यात अडचणी निर्माण होतील. परिणामी सबंध समाजाच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो. सदर निंदनिय घटनेचा आम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी निषेध करीत आहोत. या घटनेची गार्ंभीयाने दखल घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करावी. तसेच अशी घटना पुन्हा घडु नये याकरीता डॉक्टर, व कर्मचार्‍यांच्या संरक्षणार्थ योग्य ती व्यवस्था करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदन प्रसंगी पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी हितेंद्र गायकवाड, कोविड केअर सेंटर प्रमुख डॉ. आनंद तारु, नोडल अधिकारी डॉ. शरद कातकडे, डॉ. हनुमान पळवे, डॉ. सायली जंगम, डॉ. किरण खांडेकर, डॉ. प्रिया आहिरे, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. अक्षय सालपुरे, डॉ. मिलींद पारीक, आरोग्य पर्यवेक्षक केशव भामरे, एस. बी. पैठणकर, एस. ए. गांगुर्डे, जी. एन. मढवई, एस. बी. कोथमिरे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker