आपला जिल्हाकृषीवार्तामहाराष्ट्र

गायत्री कंपनीने केलेल्या माती उत्खनन तळ्यात 80 टक्के पाणीसाठा…

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

गायत्री कंपनीने केलेल्या माती उत्खनन तळ्यात 80 टक्के पाणीसाठा…पाणी वाहून जाण्यासाठी नालेच दिडशे एकर जमीन वाढण्याची भीती

 लक्ष्मण जावळे सोनेवाडी (वार्ताहर)– समृद्धी महामार्गाचे काम सध्या चांदेकसारे व देर्डे चांदवड परिसरात जोरात सुरू आहे. खाजगी शेत जमिनी विकत घेऊन समृद्धी महामार्गाच्या गायत्री कंपनीने देर्डे चांदवड येथे दोन विभागांमध्ये जमिनी खरेदी केल्या. त्या जमिनीची माती मुरूम उत्खनन करून समृद्धीच्या कामासाठी वापरला. मात्र 30 ते 40 फूट खोल झालेल्या दोन्ही तळ्यामध्ये 80 टक्‍क्‍यांच्या वरती पाणी साठले असून. त्या तळ्याचे केव्हाही भराव फुटून आसपास असलेल्या जमिनी वाहून जातील अशी भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वी असलेले सर्व चर उकरुन पाणी वाहून जाण्याची ची व्यवस्था गायत्री कंपनीने करावी अशी मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.
 या तळ्याजवळ सर्वे नंबर 216, 215 व इतर सर्वे नंबर मध्ये धर्मा सखाराम होन, शिवाजी चंद्रराव होन ,भाऊसाहेब पोपटराव होन, बाळासाहेब पोपट होन,  सुभाष धर्मा होन, किशोर धर्मा होन, शिवाजी देशमुख ,बाबासाहेब शिलेदार ,रवींद्र शितोळे आदीसह अनेक शेतकऱ्यांच्या जवळपास दीडशे ते दोनशे एकर जमिनी आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन, मका, ऊस, कपाशी आदी पिके घेतली असून ही पिके आज रोजी चांगल्या स्थितीत आहे. परंतु गायत्रीने दोन विभागात जवळपास अडीच एकर व साडेसहा एकर जमीन खाजगी शेतकऱ्यांकडूनविकत घेऊन तेथे उत्खनन करून जवळपास तीस ते चाळीस फूट खोली करत हा मुरूम व माती समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरली. परंतु सध्या या परिसरात अतिवृष्टी झाल्याने आजूबाजूचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले सर या तळ्याच्या बाजूलाच बुजले गेल्याने पाणी या तळ्यामध्ये साठले गेले.अजून काही प्रमाणात या तळ्यात पाणी साचले तर भरावा फुटून हे सर्व पाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाईल व येथील शेती वाहून जाईल अशी भीती सुभाष धर्मा होन यांनी व्यक्त केली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणीही त्यांनी केली. तळ्याच्या बाजूलाच होन यांनी पन्नास फूट विहीर खनलेली आहे. तळ्याचा भराव फुटला तर ही विहीरही बुजली जाईल.अनेक वेळा यासंदर्भात गायत्री कंपनीच्या विरोधात येथील शेतकर्‍यांनी आंदोलन केले आहे मात्र हे आंदोलन मोडित काढण्यात आले आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होन यांनी केली आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker