आपला जिल्हामहाराष्ट्र

शिक्षक संघटनेची अन्नत्याग ; मकरंद सोनवणे सभापती कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल यांच्या कडून आंदोलन कर्त्यांना आधार व मार्गदर्शन

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ नोव्हेंबर २०११  च्या शासन निर्णय नुसार प्रचलित नियमाने अनुदान देण्याबाबत शिक्षक संघटनेची अन्नत्याग पायी दिंडी  (अन्न त्याग दिंडी मधील शिक्षकांची प्रकृती खालावली)

 मकरंद सोनवणे सभापती(कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल) यांच्या कडून आंदोलन कर्त्यांना आधार व मार्गदर्शन

अंदरसुल सचिन सोनवणे – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्व शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळणे त्याचबरोबर विनाअनुदानित अंशत अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण या दोन प्रमुख मागण्या करिता नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांती चौक औरंगाबाद ते मुंबई विधान भवन मुख्यमंत्री निवास राज्यपाल शिक्षण मंत्री निवासस्थान येथे अन्नत्याग पायी दिंडी चे आयोजन केले आहें. अन्नत्याग पायी दिंडी चा 5 वा दिवस पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौक औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायथ्याचे पूजन करून औरंगाबाद ते रस्त्ये सुरेगाव येथे आगमन झाले.

दिनांक ३१ जुलै ला सुरेगाव पासून पायी दिंडी मुंबई मंत्रालयाकडे निघाली आहे राज्यातील २०  टक्के अंशतः अनुदानित शाळा १६२८ या १/२ जुलै या शाळा शंभर टक्के अनुदानावर असताना २०% सरसकट अनुदान देण्यात आले. त्यामुळे आज या शाळेतील शिक्षक निवृत्त होत आहे आत्महत्या करताहेत त्यामुळे त्या शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन प्रति नित्यनेमाने अनुदान द्यावी त्याचबरोबर १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील प्राथमिक माध्यमिक व 

उच्च माध्यमिक

१६५८ १४६ घोषित, अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक नैसर्गिक तुकडी निधी सहित घोषित करून प्रचलित नियमानुसार मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावी शासनास विनंती आहे की मागण्या मान्य करा. १५-१५ वर्षापासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा जोपर्यंत न्याय मिळत नाही आमचा जीव गेला तरी आम्हाला परवा नाही याची शासनाने नोंद घ्यावी.आम्ही आता कोणत्याही परिस्थिती मध्ये आम्ही मागे हटणार नाही असा कडक इशारा नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे यांनी दिला आहें. या अन्न त्याग दिंडी मध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी शिक्षक गजानन खैरे यांची प्रकृती खालावल्याची माहिती हाती येत आहें. आज अन्न त्याग पायी दिंडीस भेटण्याकरिता संगीता ताई शिंदे अमरावतीहून आल्या त्यांनी पायी दिंडी सहभाग घेउन पुढील नियोजन करत आहे तसेच अंदरसूल येथे मकरंद सोनवणे सभापती(कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरसूल) यांनी अन्नत्याग पायी दिंडीतिल सर्वांचा आदरतिथ्य करून सत्कार केला व आंदोलन कर्त्यांना आधार देत समजावून मार्गदर्शन केले. कि शासन अनुदाना प्रश्नी सकारात्मक असून लवकरच निर्णय होईल त्यामुळे असे आंदोलन करून एवढी टोकाची भूमिका घेवू नका अशी विनंती केली. व मा.ना.भुजबळ साहेबांचा नाशिक येथे संपर्क करून देण्याचे सांगितले. गजानन खैरे, संगीताताई शिंदे, मकरंद सोनवणे, माणिक मढवई सर, पानसरे सर, अनिस सर, कमलेश राजपूत, अमोल निकम. रायते सर. वाघ सर, शिंदे सर, नारायणे सर, गोरख कुळधर, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, गणेश सोनवणे, सागर गाडेकर, संदिप बोढरे, शिवप्रसाद शिरसाठ, अक्षय खैरनार, रामदास गायके आदींनी आंदोलन कर्त्यांची भेट घेवून त्यांना आधार दिला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker