आपला जिल्हाब्रेकिंग
कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढते नागरिकांनी काळजी घ्यावी – नितिनराव औताडे
संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
X
Follow
कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढते नागरिकांनी काळजी घ्यावी – नितिनराव औताडे
पोहेगांव व देर्डे चांदवड प्रत्येकी एक रूग्ण
लक्ष्मण जावळे सोनेवाडी – कोपरगाव तालुक्यात सध्या कोरोनाव्हायरसने थैमान घातले असून प्रत्येक दिवशी येणारे आकडे ही चिंता वाढवणारी बाब आहे. शहरासह ग्रामीण भागातही आता कोरोनाने डोके वर काढले आहे. संसर्ग वाढू लागला आहे नागरिकांनी आता गर्दीत जाणे टाळले पाहिजे. मास्क व सँनिटायझरचा वापर सतत केला पाहिजे. प्रशासन व आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे आवाहन शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे कोरोणा बाधित सापडलेला परिसर सील करताना बोलत होते. यावेळी पोहेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन बडदे, सरपंच अमोल औताडे, उपसरपंचप प्रशांत रोहमारे,दादासाहेब औताडे, राजेंद्र औताडे ,गणेश औताडे, राजेंद्र गरूड आदीसह पोहेगांव कोरोना दक्षता समिती सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ नितिन बडदे यांनी सांगितले की संजीवनी यथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्नाच्या संपर्कात आल्याने पोहेगाव येथील एक व देर्डे चांदवड येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या अकरा संशयित रूगनाचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. देर्डे चांदवड येथील पॉझिटिव निघालेल्या रुग्णाचा परिसरही सील करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या संशियतांचेही स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. पोहेगाव परिसर संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येईल असे सरपंच अमोल औताडे यांनी सांगितले तसेच उद्याच्या चाचण्या नंतर आलेले रिपोर्ट पाहून पोहेगावच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल केला जाईल असे त्यांनी सांगितले.
