नाशिक 

राहुल गांधी यांना धक्काबुक्की, येवल्यात काँग्रेसचा रास्ता रोको

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
राहुल गांधी यांना धक्काबुक्की, येवल्यात काँग्रेसचा रास्ता रोको
येवला :- हाथरास येथे काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा येवला शहर व तालुका काँग्रेसने निषेध करून मोदी सरकार विरोधी जोरदार निदर्शने करत रास्तारोको करण्यात आला.
उत्तरप्रदेशातील हाथरास येथील बलात्कार  प्रकरणातील पीडितेच्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका वाड्रा यांचा ताफा पोलिसांनी अडवून पायी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.  या बाबत माध्यमांमध्ये वृत्त झळकताच काँग्रेस प्रेमिं मध्ये संतापाची लाट उसळली.
जाहिरात
दरम्यान, येवला येथे सांयकाळी 7 वाजता येवला तालुका काँगेसने विंचूर चौफुली येथे प्रतिकात्मक रास्ता रोको आंदोलन करून मोदी सरकार व योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी येवला तालुका काँग्रेस अध्यक्ष समीर देशमुख, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, सुरेश गोंधळी, प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker