नाशिक 

रोजगार सेवक बैठकीत सभापतींचे मार्गदर्शन उत्कृष्ट कृती आराखडा आणि दर्जेदार काम करणार्‍या रोजगार सेवकांना पंचायत समिती गौरवणार

पादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
                                                       रोजगार सेवक बैठकीत सभापतींचे मार्गदर्शन     
                    उत्कृष्ट कृती आराखडा आणि दर्जेदार काम करणार्‍या रोजगार सेवकांना पंचायत समिती गौरवणार
येवला:- प्रतिनिधी… येवला तालुक्यातील रोजगार सेवकांची बैठक संपन्न झाली.  अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड हे होते. सदर बैठकीत सभापती गायकवाड यांनी सूचनांसह मार्गदर्शनही केले.
सन 2020 व 2021चा रोजगार हमी योजनेचा गाव आराखडा तयार करण्यासाठी तो परिपूर्ण कसा असावा, शासनाने 2 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या निर्णया नुसार कृती आराखडा कशा पद्धतीने बनवावा यासंदर्भात येवला पंचायत समिती सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार हमी योजनेंतर्गत येणारी कामे अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी गाव आराखडा परिपूर्ण असावा. तो बनवतांना गावातील प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे व ग्रामिण भागातल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला रोजगार कसा मिळेल, तसेच पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार, शेततळे आदी शेतकरी हिताची जास्त जास्त कामे आराखड्यात सामाविष्ट करण्याची सुचना यावेळी सभापती गायकवाड यांनी दिल्या.
प्रत्येक रोजगार सेवकाने गावातील गावाचा आराखडा बनवतांना  गावाचा  भौगोलिक अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. गावामध्ये शिव रस्ते, नद्या,  बंधारे, पाझरतलाव, नाला बंडिंग आदीसह विविध बाबींची माहिती घेवुन परिपूर्ण व सुव्यवस्थित आराखडा बनवणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सभापती गायकवाड यांनी सांगीतले. उत्कृष्ट कृती आराखडा तयार करणार्‍या, तसेच चांगले आणि दर्जेदार काम करणार्‍या रोजगार सेवकांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती गायकवाड यांनी यावेळी जाहिर केले. बैठक प्रसंगी ग्रापंचायत विस्तार अधिकारी यादव, रोजगार एपीओ सपकाळ तसेच रोजगार सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रविण पाटील यांनी केले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker