महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा वर्धापन दिन साजरा
संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४
Follow
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा वर्धापन दिन साजरा
नाशिक (येवला) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबाहादुर शास्त्री यांची जयंती तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजारोहनाने झाली.या कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा विभाग प्रमुख प्रा.शिरीष नांदूर्डीकर यांनी केले होते. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ६८ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री ,महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे, संस्था संवर्धक कर्मवीर व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या नंतर गुगल मिटद्वारे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.मनिषा गायकवाड, प्रा.कैलास बच्छाव,प्रा. डी.के कन्नोर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्या विषयी विचार मांडणी केली.तसेच संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे हे होते . याप्रसंगी विचार मांडताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते. महाराष्ट्रात त्यांनी कुळकायदा आणून समाजाला न्याय मिळवून दिला. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी जनतेचे प्रश्न व अडचणी दूर करण्यासाठी नेहमीच अग्रक्रम दिला. गांधी विचार हाच कर्मवीरांचा आचार होता आणि त्यातूनच २ ऑक्टोबर १९५२ रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर या शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. तर संस्थेचे संवर्धन लोकनेते व्यंकटराव हिरे, लोकमाता पुष्पाताई हिरे,समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे,डॉ.अपूर्वभाऊ हिरे, डॉ.अद्वयआबा हिरे यांनी संस्थेचा विकास केला व आज महाराष्ट्रातच नव्हे तर राजस्थान पर्यंत संस्थेमार्फत शिक्षण दिले जाते. ही अभिमानाची गोष्ट आहे.या कार्याकामचे सूत्रसंचालन प्रा. ठका.सांगळे यांनी केले तर आभार डॉ.गौतम कोलते यांनी मानले.या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.शिवाजी गायकवाड कार्यालयीन अधिक्षक शंकर बच्छाव कनिष्ठ विभागाचे प्रा. शांताराम पानपाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा रघुनाथ वाकळे डॉ.गजानन भामरे डॉ. संजय देवरे प्रा. बापू शेलार प्रा. शरद चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.