आपला जिल्हाकोपरगाव 

पद्मभुषण विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ पुस्तक प्रकाशनास कोपरगांवकरांचा मोठा प्रतिसाद

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

पद्मभुषण विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’
पुस्तक प्रकाशनास कोपरगांवकरांचा मोठा प्रतिसाद

कोपरगांव (राधाकीसन देवरे) – नगर जिल्ह्यासह राज्य व देशाच्या राजकारणात अलौकीक ठसा उमटवणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या — देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार हे दोन्ही कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे मंगळवारी पार पडले. हा कार्यक्रम व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून कोपरगांव येथील लोढा मंगल कार्यालयात प्रसारित करण्यात आला. तालुक्यातील अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

प्रारंभी प्रवरानगर येथे आयोजित केलेल्या या व्हर्च्यअल रॅलीचे प्रसारण दाखविण्यात आले. माजी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.  मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी आपल्या भाषणातून — देह वेचावा कारणी ‘ या आत्मचरित्रातून विखे पाटील यांनी तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रातील वाटचालीसोबतच आपला समाज, गांव, तसेच लोकांच्या स्वातंत्र्योत्तर काळातील विविध घडामोडीचा आढावा शब्दबध्द केला असून हे आत्मचरित्र राज्याला व राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पद्मभुषण डॉ. विखे पाटील यांच्या राजकीय वाटचालीचा आणि कार्याचा गौरव केला. भांडवलशाही आणि अर्थकारणाच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वासाठी डॉ. विखे पाटील यांनी दिलेले योगदान कुणालाही विसरता येणार नाही. यासाठी त्यांनी केलेला संघर्ष शेतकऱ्यांना न्याय देणारा ठरला. शेतीबरोबरच शिक्षण, सहकार आणि पाणीप्रश्न हे त्यांच्या राजकीय जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ. विखे पाटील यांनी ग्रामीण शिक्षणाचा विस्तार करतानाच कौशल्य विकासाला प्रामुख्याने प्राधान्य दिले. आज विखे घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रीय असून प्रत्येक पिढीचा आलेख उंचावत जाणारा असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी डॉ. विखे पाटील यांचे जीवन चरित्र देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वाटचालीत मैलाचा दगड ठरणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब कोयटे, पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर, संभाजीराव काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे पाटील, राजेंद्रबापू जाधव, सभापती पौर्णिमा जगधने, माजी सभापती अनुसयाताई होन, पंचायत समिती सदस्या सौ. वर्षाताई दाणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, विवेक परजणे, ज्ञानदेव गुडघे, बाबासाहेब फटांगरे, मच्छिंद्र टेके, अर्जुनराव काळे,
संजय सातभाई, अरुणराव येवले, आप्पासाहेब दवंगे, संजयराव होन, नानासाहेब सिनगर, सुभाषराव होन, रामविलास मुंदडा, जयप्रकाश लोणारी, राजेंद्र झावरे, कैलास जाधव, चंद्रकांत शिंदे, मंगेश पाटील, विजयराव आढाव, गणेश आढाव, संजय जगताप, बाबुराव खालकर,
राजेंद्र शिरोडे, संजय भनसाळी, अॅड. बाळासाहेब कडू, अॅड. वाल्मिकराव काजळे, उत्तमराव कुन्हाडे, मधुकरराव टेके, विकास आढाव, डॉ. अजेय गर्ने, डॉ. गोंधळी, डॉ. प्रकाश पहाडे, रवींद्र पाठक, दत्तात्रय कोल्हे, दत्ता काले, बाळासाहेब चव्हाण, हिरालाल महानुभाव, अशोकराव खांबेकर, सुनील देवकर, संजय नागरे, विनोद राक्षे, एस. के. थोरात, विजय वडांगळे, पंडितराव वाघिरे, कारभारी आगवन, शरदराव थोरात, भरत बोरनारे, सुरेशराव कोल्हे, भास्कर तिरसे, राहूल टेके, अॅड. शरदराव जोशी, गोरखनाथ शिंदे, अजयराव आव्हाड, राहूल जगधने, जितेंद्र गंगवाल, सचिन अजमेरे, मनिष शहा, खंडू फेफाळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव साबळे, लक्ष्मणराव परजणे यांच्यासह गोदावरी दूध संघाचे संचालक व तालुक्यातून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राजेश परजणे पाटील यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात 2
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker