आपला जिल्हाकोपरगाव 

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वाचन-प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वाचन-प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा

कोपरगाव – कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १५आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला. 

श्री.गो.विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या डीजीटल तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले.विदयालयांचे जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करा असे सांगितले. मराठीचे गोरे एस.डी .यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांचा जीवनपट विदयार्थांना सांगितला.ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल वितरीत केल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन श्री. कुळधरण बी.बी.यांनी तर आभार जेष्ठ शिक्षक श्री.रवि पाटील यांनी मानले.
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे आदीनी वाचन-प्रेरणा दिवसांच्या विदयार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दील्या. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री. तुपसैंदर डी.व्ही, श्री.अमृतकर ए.बी, श्री.कोताडे ए.जे, श्री.एन.के.बडजाते उपस्थित होते. तसेच इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी झुम मिटींग व्दारे आॕन लाईन उपस्थित होते.

जाहिरात 2
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker