आपला जिल्हाकोपरगाव 

साई निवारा मित्र मंडळातर्फे श्री सप्तशृंगी माता मंदिर नवरात्रोत्सव व वर्धापन दिनाचे फक्त धार्मिक विधीचे  आयोजन 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

साई निवारा मित्र मंडळातर्फे श्री सप्तशृंगी माता मंदिर नवरात्रोत्सव व वर्धापन दिनाचे फक्त धार्मिक विधीचे  आयोजन 

कोपरगाव- कोरोनाच्या महाभयंकर संसर्गजन्य महामारीमुळे राज्यातील सर्वच मंदिरे अजूनही बंदच आहेत. निवारा-सुभद्रानगर परिसर व शहरातील भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या      श्री सप्तशृंगी माता मंदिराचा नवरात्रौत्सव व वर्धापन फक्त धार्मिक विधीचे आयोजित केल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समिती प्रमुख सौ.सुहासिनीताई कोयटे व साई निवारा मित्रमंडळाचे अध्यक्ष, नगर सेवक श्री.जनार्दन कदम यांनी दिली.

धार्मिक दृष्टीने नवरात्रौत्सवाला अधिक महत्व असल्यामुळे सर्व धार्मिक परंपरा जोपासत निवारा-सुभद्रानगर परिसरात सप्तशृंगी देवी मंदिरात नवरा त्रौत्सव व वर्धापन दिन साध्या पद्धतीने शासकीय निर्देशांचे पालन करत होणार असून  १७ ऑक्टोबर २०२० पासून प्रथेप्रमाणे सर्व परंपरा जोपासत नऊ दिवसात मंदिरातील घट स्थापना, नित्य आरती, सप्तशती पाठ,   होम-हवन अभिषेकासाठी मंदिरातील पुजारी, सोहळ्याचे मानकरी यांच्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे तसेच सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे साई निवारा मित्र मंडळाचे वतीने सांगण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे उलंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घेत कोरोना या विषाणूजन्य रोगाला हरविण्यासाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, तोंडाला मास्क लावणे व हात स्वच्छ धुणे बंधनकारक असून नवरात्रोत्सवात परिसरातील नागरिकांनी तसेच कोपरगाव शहरातील  काळजी घ्यावी. असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती प्रमुख सौ.सुहासिनीताई कोयटे  व साई  निवारा मित्रमंडळाचे अध्यक्ष, नगर सेवक श्री.जनार्दन कदम यांनी केले आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker