आपला जिल्हाकोपरगाव 

येवला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

येवला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

कौसर सय्यद येवला (नाशिक) –  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला जि नाशिक येथे भारताचे 11 वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. भाऊसाहेब गमे हे होते, या प्रसंगी स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ.मनोहर पाचोरे यांनी बोलताना डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यांचे जीवन हे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. असे सांगितले. तर दुस-या वक्त्या डॉ मनिषा गायकवाड यांनी विज्ञान आणि धर्म यासंबधी कलामांची भूमिका संदर्भात मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे यांनी विद्यार्थ्यांना वाचन गौरव दिनानिमित्त वाचनाचे महत्व पटवून दिले. वाचनामुळे माणसाचे जगणं सुसह्य होते. व आपले व्यक्तिमत्व घडण्यासाठी मदत होते. त्यामुळे अनुभव विश्वाची समृद्धी होते.असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ठका सांगळे यांनी केले तर आभार प्रा. शरद चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शिवाजी गायकवाड ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker