आपला जिल्हाकोपरगाव 

कोपरगाव युवक काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस समन्वय बैठक उत्साहात संपन्न

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात
संघटना वाढीसाठी पूर्ण ताकदीने भरभक्कमपणे आपल्या मागे उभे राहू – जिल्हा समन्वयक किरण काळे
प्रतिनिधी :- शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कॉंग्रेस कमिटी युवक व विद्यार्थी काँग्रेस बैठक काँग्रेस पक्षाचे नेते खा.राहुल गांधी,प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली,काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक,एनएसयुआय जिल्हा समन्वयक किरण काळे,युवक काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकीलभाई पटेल,कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा,समनवयक संदीप पुंड,शेखर सोसे,जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर,जिल्हा युवक काँग्रेसचे तुषार पोटे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,अल्पसंख्याक काँग्रेस यांच्या उपस्थितीत पार पडली.
बैठकीप्रसंगी किरण काळे यांनी कोपरगाव तालुक्यात युवकांची उपस्थिती तसेच संघटनात्मक झालेल्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करताना युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील संघटन हे मजबूत झालेले असून भविष्यात अजून संघटना वाढीसाठी पूर्ण ताकदीने भरभक्कमपणे आपल्या मागे उभे राहू असे उदगार त्यांनी काढले,जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक खांबेकर म्हणाले की आता २१व्या शतकात युवकांची मोट क्रांती घडवू शकेल फक्त पदासाठी राजकारणाचा उपयोग न करता संघर्षनीती व काँग्रेस विचारसरणी मूल्य युवकांनी लक्षात घेऊन काम करावे,आगामी काळात युवकांचे संघटन हे कोपरगाव तालुक्यात अजुन बळकट करण्यात येईल,काँग्रेस पक्षाचा विचार कोपरगावतील ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही किरण काळे यांना जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव तुषार पोटे यांनी दिली,सदरप्रसंगी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव राजुभाई पठाण,तालुका उपाध्यक्ष शब्बीर शेख,श्री.भागवत,प्रशांत आहेर,जय कदम तसेच तालुक्यातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker