आपला जिल्हाकोपरगाव 

सोनेवाडीत एचपी गॅस ग्राहक सेवा केंद्र सुरू

संपादक मनीष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात
सोनेवाडीत एचपी गॅस ग्राहक सेवा केंद्र सुरू
सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गोपाल कृष्ण गॅस कंपनीने एचपी गॅस ग्राहक यांच्या सोयीसाठी सोनेवाडी मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला गॅस कंपनीमार्फत कंपनीमार्फत उपशाखा देत ग्राहकांना दररोज गॅस उपलब्ध होईल या दृष्टीने नवे पाऊल टाकले.गोपाल कृष्ण गॅस कंपनीचे मुख्य प्रवर्तक बाबासाहेब परजणे यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या समस्या जाणून घेत सोनेवाडी येथील रविकिरण आहेर यांना गॅस कंपनीची उपशाखा ओपन करून दिली.काल शनिवारी सकाळी कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्राहकांना एचपी सिलेंडरचे वाटप करत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पत्रकार पि डी आहेर, रावसाहेब जावळे, विनायक चव्हाण, लीलाधर जावळे,चैतन्य भोसले,ज्ञानेश्वर साळवे,बाबासाहेब जावळे ,रमेश ढवळे, पका सरोदे, तौफिक मनियार अदी उपस्थित होते.सोनेवाडी येथे गोपाल कृष्ण गॅस कंपनीचे 400 जलधारक असून या धारकांना या शाखेचा लाभ मिळणार असल्याचे व्यवस्थापक रविकिरण अहेर यांनी सांगितले.गॅस कंपनीने ठरवून दिलेलेच गॅस सिलेंडरचे पैसे ग्राहकांकडून स्विकारणार असून कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त चार्ज आम्ही लावणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.शेवटी आभार चैतन्य भोसले यांनी मानले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker