आपला जिल्हा

स्वतः ला व इतरांना सुरक्षित ठेवा – प्रशांत सरोदे मुख्याधिकारी 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

स्वतः ला व इतरांना सुरक्षित ठेवा…मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर कराप्रशांत सरोदे मुख्याधिकारी

कोपरगाव – गेली सात महिन्या पासून संपूर्ण जगभरात कोविड -१९ ने थैमान घातले असून त्यातून प्रत्येकजण आपापल्या परीने कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव नगरपरिषदेने देखील शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहराचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत व करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार प्रत्येक लॉकडाऊनच्या कालावधी मध्ये कोपरगांव नगरपरिषद, तहसील, आरोग्य व पोलीस प्रशासनास शहरातील सर्व नागरिक, व्यापारी व सामाजिक संस्था यांनी अंमलबजावणी करण्यास मोलाची साथ दिली.
सर्वांच्या पुढाकाराने कोपरगावकरांच्या सेवेसाठी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ.फुलसुंदर व त्यांची संपूर्ण टीम तसेच मदतीस कोपरगाव नगरपरिषदेची आरोग्य विभागाची टीम यांच्या बहुमोल सेवेने  गेले सात महिन्यापासून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या कोविड केअर सेंटर ला येणाऱ्या विविध अडचणी बाबत न चुकता दिवसातून एक तरी भेट नियमितपणे देत होतो. दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषद कार्यालयातील सहकारी अधिकारी व वाहन चालक यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची देखील तपासणी केली. मला थोडा ताप होता म्हणून सर्वांसोबत मी देखील माझी स्वत:ची कोरोना तपासणी केली व टेस्ट + Ve आली.
मला कोरोना संसर्ग झाला असे समजल्यावर काळजीपोटी  घरातील सदस्य, नातेवाईक व  मित्रांचे फोन आले की, उपचारासाठी पुणे, नाशिक, जळगाव इ. शहरातील  रुग्णालयात ऍडमिट हो,परंतु मी मला नियमित परिचित असलेले एस.एस.जी.एम. महाविद्यालय येथील कोविड केअर सेंटर ला ऍडमीट झालो.  येथे सात दिवस डॉक्टर,त्यांची सर्व टीम तसेच कोविड सेंटर ला कार्यरत नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी  व्यवस्थित काळजी घेऊन औषधोपचार केले.  या सात दिवसामध्ये माझी काळजी करणारे आई वडील, भाऊ, पत्नी, मुली, मित्रमंडळी, नातेवाईक, शहरातील सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व सहकारी अधिकारी, शहरातील नागरिक, व्यापारी,  पत्रकार बंधू,  व माझे नगरपरिषद अधिकारी  आणि कर्मचारी यांनी माझी तब्येतीची वारंवार विचारपूस केली व मला आजारा विरुध्द लढण्यासाठी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो…
डॉक्टरांचे औषधोपचार, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा व स्वतःची सकारात्मक विचार शक्ती यामुळे  दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी मला कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर घरी पुढील सात दिवस गृह विलगीकरण (सुदैवाने घरीतील कोणाची टेस्ट + Ve आली नाही.) घरात असून देखील एका खोलीत वेगळे राहणे, मुली व पत्त्नी यांच्या सोबत एकत्र बसून जेवण, गप्पा न करणे हे मनाला रुचत होते परंतु ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तोच पर्याय उत्तम होता. आपल्या मुळे कोणाला ही संसर्ग होऊ नये याकरिता प्रत्येक कोविड रुग्णाने काळजी घेतली पाहिजे…
आई वडिलांचे आशीर्वाद व आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यामुळे दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी कर्तव्यावर हजर झालो. कार्यालयात   नेहमीच माझी ऊर्जा असलेले माझे सर्व सहकारी अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, मित्रपरिवार यांनी माझे भव्य स्वागत केले…! आपण सर्वांना  विनंती पूर्वक सांगू इच्छितो की, कोविड रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना आधार द्या… कुटुंबातील लहान मुले व जेष्ठांची काळजी घ्या…सावध रहा… स्वतः ला व इतरांना सुरक्षित ठेवा…मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करा अशी विनंती कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केली.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker