आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

फादर स्टेन स्वामी यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन  तात्काळ सुटका करावी अन्यथा राज्यात जनआंदोलन करु – फ्रॅडी फर्नाडीस

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

फादर स्टेन स्वामी यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन  तात्काळ सुटका करावी अन्यथा राज्यात जनआंदोलन करु – फ्रॅडी फर्नाडीस

महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा इशारा 

कोपरगाव – ख्रिस्ती मिशनरी व समाजसेवक फादर स्टॅन्ड स्वामी यांना भीमा कोरेगाव दंगलीतील सहभागाचा वहीम ठेवन अटक करण्यात आली. वस्तुतः फादर स्वामी हे आदिवासी व दुर्गम क्षेत्रीय गरीब लोकांमधील सेवाकार्यामुळे परिचित आहेत व तिच त्यांची खरी ओळख आहे. मात्र असामाजिक कृत्य करणार्या गटासोबत त्यांचे नाव जोडून झालेली अटक निषेधार्ह आहे. देशभरातील ख्रिस्ती समाजाच्या भावना तिव्र झाल्या आहेत. फादर स्वामी यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण राज्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे कोपरगाव अध्यक्ष फ्रॅडी जोसेफ फर्नाडीस यांनी दिला.

जाहीररीत्या व संसदेतील भाषणात देखील ख्रिस्ती सेवकांच्या सेवेबद्दल संशय व्यक्त करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. या प्रकारांमुळे ख्रिस्ती समाज व्यथित आहे. या घटनांमध्ये कुठेतरी जातीयवादाचा वास जाणवतो ही समाज भावना आहे. फादर स्टेन यांचे वय 83 वर्षाचे आहेत त्यात कोरोना परिस्थितीमुळे त्यांच्या विषयी समाजात चिंता वाढत आहेत परंतु सदर प्रकरणात फादरांचा कुठेही संबंध नसताना देखील हेतूपुर्वक त्यांना  गोवण्यात आले असावे असेही समाज बांधवांच्या निदर्शनास येत असल्यामुळे देशभरातील ख्रिस्ती समाजाच्या भावना तिव्र झाल्या आहेत. फादर स्वामी यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण राज्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेने देवुन याबाबतचे लेखीनिवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे कोपरगाव अध्यक्ष फ्रडी जोसेफ फर्नाडीस, उपाध्यक्ष सुनील बाबुराव लोंढे , संपर्कप्रमुख सचिन सुनिल बोरुडे, शेखर तोरणे, रवी पंडित, प्रशांत आहिरे, जॉन कदम, जॉन दिवे ज्ञानेश्वर चक्रे, विजय कोपरे आदि समाज बांधव उपस्थितीत होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker