आपला जिल्हाकोपरगाव 

पोहेगांव व्यापारी असोसिएशनच्या रक्षक दलाचे काम कौतुकास्पद – पोलीस उपअधीक्षक संजय सातव 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात
पोहेगांव व्यापारी असोसिएशनच्या रक्षक दलाचे काम कौतुकास्पद – पोलीस उपअधीक्षक संजय सातव 
कोपरगाव –  पोहेगाव व परिसरातील व्यापारी संकुलातील गाळे फोडी व चोऱ्या थांबण्यासाठी पोहेगाव व्यापारी असोसिएशनने व्यापारी ग्रामरक्षक दल स्थापन करून यावर आळा घातला. पोहेगाव प्रशासनानेही यात लक्ष घातले त्यामुळे गेल्या काही महिन्यांत चोरीमारीची एकही घटना घडली नाही. सर्व व्यापारी व व्यावसायिक यात सहभागी झाले. चालू असलेलेहे काम त्यांनी सुरूच ठेवावे.पोहेगांव हे एक आदर्श गाव असून व्यापारी असोसिएशनच्या ग्रामरक्षक दलाचे कामही कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिर्डी पोलीस स्टेशनचे उपअधीक्षक संजय सातव यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयात व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शिवसेना नेते नितीनराव औताडे,सरपंच अमोल औताडे,उपसरपंच प्रशांत रोहमारे, पोलीस उपनिरीक्षक दिपक गंधाले, जाणे, देशमुख श्री मकासरे , ग्रा.प. सदस्य निखील औताडे, पोहेगाव व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, अशोकराव नवले, बाबासाहेब रोहमारे, प्रकाशराव रोहमारे, विनायक मुजगुले, रमेशशेठ झांबरे,शंकरराव वाघ, निवृत्ती औताडे,सुभाष औताडे,राजेंद्र कोल्हे, भुषण औताडे, शरद शेजवळ, श्रीकांत रांधव, शहारुख शेख, पद्माकर उदावंत ,राजेंद्र गरुड,सागर मखिजा, राजेंद्र बोरा, भाऊसाहेब वाघ, ज्ञानदेव चौधरी, गणेश देशमुख, सोमनाथ औताडे, प्रमोद भालेराव, सुरेश लोखंडे आदिसह व्यापारी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अमोल औताडेे यांनी केले.आत्ताच शिर्डी उपविभागीय पोलीस स्टेशन चे उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोहेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नितीनराव औताडे यांनी संजय सातव यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना नितीनराव औताडे यांनी पोहेगावची भौगोलिक परिस्थिती मांडली.उपअधीक्षक पदावर संजय सातव यांनी कर्जत मध्ये केलेले काम सर्वांना माहीत आहे.त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत  गुन्हेगारीला आळा घालता. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पोहेगांव आऊट पोस्टसाठी दोन पोलिस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येईल तसेच पोहेगाव परिसरामध्ये छुप्या  पद्धतीनेे असलेले
अवैद्य धंदे बंद करण्यात येईल अशी ग्वाही पोलीस निरीक्षक दीपक गंधाळे यांनी दिली. नियोजित असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या कामाची पहाणी उपअधीक्षक संजय सातव यांनी पहाणी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच प्रशांत रोहमारे यांनी आभार मानले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker