आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

वारी येथील नवसाला पावणारी देवी -आई जगदंबा

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

वारी येथील नवसाला पावणारी देवी – आई जगदंबा

सृष्टिस्थिती विनाशानां शक्ती भुते सनातनि।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते।।

कोपरगाव / जनार्दन जगताप
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे आई जंगदंबेचे मोठे मंदिर असून ते गोदावरी तीरी पूर्वेस तोंड करून आहे. त्यामुळे वारीच्या नावलौकिकात भर पडली नवरात्र काळात विशेष असे कार्यक्रमाचं आयोजन केले जाते.नऊ दिवस यात्रोत्सव साजरा केला जातो.

गावाच्या दक्षिणेस गोदावरी तीरी पूर्वाभिमुख असे भव्य मंदिर असून मंदिर समोर मोठी दीपमाळ उभी आहे.तसेच समोर भव्य असा मंडप असून प्रतिपदेच्या दिवशी येथे घटस्थापना करून उत्सवास सुरुवात केली जाते.वारी ता.कोपरगाव येथे देवीचे मंदिर बांधण्यापूर्वी हि देवी मायगाव देवी ता.कोपरगाव येथील मंदिरात होती. हि मूर्ती मायगाव देवी येथून निघून गोदावरीच्या पाण्याबरोबर कान्हेगाव येथे आली. कान्हेगाव येथे नृसिंह मंदिर असल्याने त्यांनी कान्हेगाव येथे देवीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी दिली नाही त्यामुळे हि देवीची मूर्ती पुढे जाऊन वारी येथे थांबली त्यानंतर तेथे ग्रामस्थांनी देवीची प्रतिष्ठापणा करून मंदिर बांधले.आजही मायगाव देवी येथे देवीचे मंदिर असून तेथील मंदिरात दुसरी मूर्ती बसविण्यात आली आहे अशी आख्यायिका आहे. हि मूर्ती स्वयंभू असून उंच आहे. तेव्हा पासून आजपर्यंत अखंड देवीची आराधना चालू आहे.परिसातील भाविक मोठ्या संख्येने येथे येऊन देवीची पूजा,अर्चा व आराधना करतात.आई जगदंबा म्हणजे आदिशक्ती ही शक्ती सर्व ठिकाणी कार्यरत असते.ती अणुरेणूत भरून राहिलेली आहे.हे सर्व जगत या शक्तीने व्यापलेले आहे.वेदातील ऋषींनी सर्व सहा, आदिजननी,महालक्ष्मी,करुणामयी, अत्यान्तिक प्रेमवाली, दुःख व दारिद्र्य यांचा नाश करणारी या आदी शक्तीस ‘श्री’ असे म्हटले आहे.ऐश्वर्याची देवी,भगवती,महालक्ष्मी,दुर्गा असे वेगवेगळे रूप धारण केलेली राक्षसांचा संहार करणारी व भक्तांना पावणारी देवी म्हणजे एकच आदिशक्ती आहे.अशा प्रकारे वेगवेगळी नावे व भिन्न प्रकारच्या कथा आपणास पुराणात ऐकावयास मिळतात. मनुष्यमात्राला आपला संसार सुखाचा चालावा म्हणून देवीचे व्रत करावे लागते व त्याचे फळही मिळते. निर्मळ अंतःकरणाने केलेली पूजा-विधी उत्तम प्रकारचे फळ देते. दरवर्षी नऊ दिवस रात्री देवीचा जागर होतो व शेवटच्या दिवशी कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येते.मात्र यावर्षी शासनाची परवानगी नसल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या असलेल्या नवरात्र उत्सवाची परंपरा खंडित झाली आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker