आपला जिल्हाकोपरगाव 

पिकांची नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू – आमदार आशुतोष काळे

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

पिकांची नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :- मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात रविवार (दि.१८) रोजी दुपारी व मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या मागास सोयाबीन, बाजरी, मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. जाणता राजा अशी ओळख असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने आजवर शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कोट्यावधींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यात आली आहे. चालूवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड असून या पावसाने सर्व विक्रम मोडले आहे. वैश्विक कोरोना संकट, काही महिन्यापूर्वी आलेले चक्रीवादळ अशा संकटांचा महाविकास आघाडी सरकारने यशस्वी मुकाबला केला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला माल घरात येण्यापुर्वीच निसर्गनिर्मित संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.मागील दोन दिवसांपूर्वी येवू घातलेल्या चक्रीवादळातून आपला जिल्हा थोडक्यात बचावला त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी नुकसान झालेच असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न  करू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker