आपला जिल्हानाशिक 

कोटमगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोणा च्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात शुकशुकात

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

कोटमगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोणा च्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात शुकशुकात

दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना

नाशिक येवला (कौसर सय्यद ) शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असला तरी कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर व दरवर्षी होणारा यात्रा उत्सव यंदा कोरोणामुळे  बंद असल्याने दोनशे वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. यात्रोत्सव रद्द झाल्याने अनेक भक्तांचा हिरमोड झाला आहे.
कोटमगाव येथे आज सकाळी ८ वाजता संत जनार्दन स्वामी यांचे वैजापूर येथील शिष्य दत्तगी री महाराज यांचे ह स्ते घटस्थापना करण्यात आली.या वेळी जगदंबा माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष रावसाहेब कोटमे,भाऊसाहेब आदमाने, राजेंद्र कोतमे, शरद लहरे,नाना लाहरे आदी उपस्थित होते.
कोटमगाव येथील यंदाचा यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर ट्रस्ट सह व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दरवर्षी यात्रा उत्सव काळात लाखो रुपयांची उलाढाल होत असते येवला तालुक्याचे ग्रामदैवत असलेले कोटमगाव येथील जगदंबा माता ही जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जगदंबा मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. यंदा कोणाच्या महामारी मुळे सर्वांनाच मुकावे लागले आहे मंदिरे सुरु होऊन यात्रोत्सव सुरू होईल अशी सर्वांना आशा होती परंतु पुरणाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा उत्सव काळात सर्व विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी टाकली जाते मनोरंजनासाठी पाळणे, चकरी व इतर साहित्य इथे दहा दिवसासाठी असतात मात्र यंदा सर्वांवर पाणी फिरले गेले आहे. मंदिर परिसरात व ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध प्रकारच्या दुकाने थाटली जात असल्याने त्याचे ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देत असते तसेच मंदिर ट्रस्ट ला देखील भाविक श्रद्धेने देणगी देत असतात मात्र यांना मंदिर ट्रस्ट देखील  लखोचे नुकसान झाले आहे. मंदिरा च्या परिसरात नारळ हार फुले गुच्छ आधी वस्तू घेऊन व्यावसायिक बसलेले असतात मात्र तेदेखील बंद असल्याने तसेच नवरात्रोत्सव असूनही मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. कोरोणा महामारी मुळे मंदिर परिसरात घटी बसण्याची परंपरा ही खंडित झाली आहे
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker