राखेचा सदुपयोग करत वडाचे झाड लावून निसर्गाचे संवर्धन व वडाच्यामळ्याचे नाव अबाधित ठेवण्यासाठी पैठणकर व गाडेकर परिवाराचा अनोखा उपक्रम
संपादक मनिष जाधव 9823752964

Follow

राखेचा सदुपयोग करत वडाचे झाड लावून निसर्गाचे संवर्धन व वडाच्यामळ्याचे नाव अबाधित ठेवण्यासाठी पैठणकर व गाडेकर परिवाराचा अनोखा उपक्रम
राख पारंपारिक पद्धतीने गंगेत विसर्जित न करता जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न
सचिन सोनवणे नाशिक अंदरसुल – नगरसुल (वडाचा मळा) ता. येवला जि. नाशिक येथिल प्रगतशील शेतकरी व सुप्रसिद्ध हाडवैद्य कै. विष्णू (आण्णा) विठ्ठल पैठणकर (मोडके बाबा) म्हणून पंचक्रोशीत सुप्रसिद्ध होते. गुरुवार दिनांक १५ / १० / २०२० रोजी पहाटे ३ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. बाबांच्या अशा अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. संतोष माध्यमिक विद्यालय रहाडी चे मुख्याध्यापक श्री अरुण विष्णू पैठणकर यांचे वडील होते. तर श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय, भुलेगाव चे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय दामोदर गाडेकर यांचे मामा होते.
गाडेकर सर यांच्या मनात मामा विषयी नितांत प्रेम व आदर होता त्यातून मामांकडून त्यांनी आपल्या कडे असलेल्या ज्ञानाच्या जोरावर निसर्गाच्या सानिध्यातून समाज सेवा कशी करावी याचे शिकवण घेतली व त्यांच्या मनात एक विचार आला तो म्हणजे मामाच्या राखेचा कार्यक्रम शुक्रवार दि.१६/१०/२०२० झाल्या नंतर ती राख पारंपारिक पद्धतीने गंगेत विसर्जित केली जाते व त्यापासून जल प्रदूषण होते तसे न करता व जल प्रदूषण टाळण्यासाठी त्या राखेचा सदुपयोग वडाचे झाड लावून करावा त्या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन होईल व झाडाच्या माध्यमातून मामा आपल्या सोबत कायम राहतील.
त्याच बरोबर आपल्या मळ्याचे नाव हे वडाचा मळा असे वडाच्या झाडावरून करण्यात आले होते परंतु ते झाड आता मोडकळीस आले असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या साठी पुन्हा वडाचे झाड लावून मळ्याचे नाव अबाधित ठेवता येईल, हे सर्व त्यांनी लगेच परिवारा सोबत बोलून सत्यात उतरविण्याचे ठरविले त्यांना या साठी मुख्याध्यापक श्री पैठणकर सर व त्यांचे कुटुंबीय यांची खंबीर साथ मिळाली यावेळी पत्नी सिंधुबाई पैठणकर, मुलगा अरुण पैठणकर, शरद पैठणकर, गोकुळ पैठणकर, मुलगी छाया क्षिरसागर, बहीण सत्यभामा गाडेकर, सुमन गाडेकर, मनकर्णा पुंड तसेच नातू, पणतू, समस्त वडाचा मळा पैठणकर परिवार व ग्रामस्थ सावता भजनी मंडळ उपस्थित होते.