आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

समाजातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – प्रदेशध्यक्ष अशोक लकारे

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

ग्लोबल कहार समाज चॕरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – प्रदेशध्यक्ष अशोक लकारे

भिकु दादा इधाते अहवालाच्या शिफारशी लागु करण्यात यावा तसेच आरक्षण बाबतीतील विषयाबाबत लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार 
 
मनिष जाधव कोपरगाव –  शासनदरबारी प्रत्येक समाजाचा प्रतिनिधीच्या माध्यमातून अनेक समाजातील प्रश्न मार्गी लागले जातात परंतु कहार समाजातील एकही व्यक्ती उच्च पदावर नसल्यामुळे कहार समाज सुविधांपासुन वंचित असल्यामुळे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्लोबल कहार समाज चॕरीटेबल ट्रस्टची स्थापना केली असुन या माध्यमातून सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन ग्लोबल कहार समाज चॕरीटेबल ट्रस्टचे प्रदेशध्यक्ष अशोक लकारे यांनी व्यक्त केले.
ग्लोबल कहार समाज चॕरीटेबल ट्रस्टचे कार्य संपूर्ण भारतात सुरु असुन या ट्रस्टची पहिली बैठक साईबाबांच्या नगरीत राष्ट्रीय महामंत्री लक्ष्मीनारायण जी गौड, राष्ट्रीय महासचिव सुजित कुमार जी गौड, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अरविंद तुंबारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष जयसिंगराव गहिरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी अशोक लकारे बोलत होते. 
समाजातील बांधवाना मार्गदर्शन करतांना अशोक लकारे म्हणाले की, ट्रस्टची स्थापनेने समाजात मोठी शक्ती निर्माण होत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून होणारे कार्यामुळे समाज बांधवांना योग्य दिशा देखील मिळणे सोपे होणार आहेत. संस्थेचे कार्य महाराष्ट्रासह , भारतात सुरु असुन लवकरात लवकर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात या राज्यातील कार्यकारणी जाहिर होणार आहेत. समाजामध्ये काम करणे एवढे सोपे नाही, परंतु मोठ्या जोमाने एकत्र येऊन एक दिलाने काम केले तर नक्कीच संस्थेचे कार्य संपूर्ण विश्वात होईल असा आत्मविश्वास आहेत. देशाची प्रगतीसाठी आपल्यावर मोठी जवाबदारी आहेत परंतु समाजातील अनेक बांधवांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक मुले – मुली शिक्षणापासुन वंचित असल्याची आकडेवारी मोठी असल्याने ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संदर्भातील प्रश्न सोडविले जाणार त्याच बरोबर समाजातील अनेक बांधवांचे आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने वैद्यकीय प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याने संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय आर्थिक मदत देखील केली जाणार विशेष म्हणजे समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसायात जास्तीत जास्त प्रगती कशा पध्दतीने केली पाहिजे यासाठी लवकरात लवकर प्रतिष्ठात उद्योजकांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केली जाणार आहे. समाज बांधवांनी संस्थेची सभासद नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन अशोक लकारे यांनी करुन संस्थेच्या कामकाजासाठी पोपटराव जिरे सर यांनी स्वतः ची बिल्डिंगसह जागा देण्याचे जाहिर केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करुन सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रदेशध्यक्ष अशोक लकारेंनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी कमिटी सदस्य कृष्णा गौड मॅडम, दृवलाल साहनी, सुभाष धुरिया जी, रवी जी गौड यांच्यासह नाशिक, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, कोपरगाव, येवला, नांदेड, श्रीरामपूर, बीड, नेवासा, अहमदनगर, परभणी, कन्नड, राहता, आदि जिल्ह्यातील , तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर  महासचिव पांडुरंग बरे सर, महिला प्रदेश अध्यक्ष अश्विनी ताई, प्रचार मंत्री राजेंद्र, गंगुले,पांडुरंग बरे सर,सागर पर्हे,पन्नालाल बिरुटे, गोपिचंद गव्हाणे, सुजित कुमार, लक्ष्मी नारायण गौड अशोक साहनी सौ अश्विनी कुंढारे, उज्वला पंडोरे, निशा पंडोरे, मोहन डहारे राजेंद्र गंगुले,विठ्ठलराव,लकारे निळकंट कचारे,विजय डिंबर, सुनील सुळभैय्या,संजय सुरभैय्या, शिर्डी शहर अध्यक्ष ईश्वर गहिरे, मीडिया प्रभारी संतोष लकारे, कृष्णा गहिरे सर, दत्तात्रय बनगैया, डाॅ. दिनेश गरुटे बाळकडु रासने संजय मेहेरे, यांनी सदरची बैठक यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker