आपला जिल्हानाशिक 

 रेडिओ व खुले वाचनलयामुळे मुलांचा अभ्यासाला मिळणार गती

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

रेडिओ व खुले वाचनलयामुळे मुलांचा अभ्यासाला मिळणार गती

( येवला –  सय्यद कौसर )- समाज व शिक्षक यांच्या एकत्रित परिणाम प्रयत्नाने  शिक्षण होणार गतीमान करण्याचा प्रयत्न हा एक महत्वाचा घटक असून त्यामुळे निश्चितच मदत होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत परंतु शिक्षण चालू आहे. येवले तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व्हाट्सअप ग्रुपद्वारे अभ्यास, गृहभेटी, स्वाध्याय पुस्तिका याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांना शिक्षणात अडचण येत होती. यामुळे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर दंडगव्हाळ यांच्यासह शाळेच्या सर्व शिक्षकांनी अँड्रॉइड मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने रेडिओ चे वाटप केले. येवले तालुक्याचे गट विकास अधिकारी डॉ. उमेशजी देशमुख साहेब व गटशिक्षणाधिकारी मनोहरजी वाघमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रेडिओ चे वाटप करण्यात आले. याद्वारे नाशिक विद्यावाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत.
        विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी व त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे म्हणून गावातील सेवानिवृत्त प्राचार्य  प्रकाशजी देशपांडे सर यांनी दान दिलेले पुस्तके, आणि मुख्याध्यापक दंडगव्हाळ व उपशिक्षक  वाळेकर त्यांच्या स्वतःच्या संग्रहातील पुस्तके व सोमनाथ राजगुरू यांच्या एकत्रित प्रयत्नाने गावात खुले  वाचनालय सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन याच कार्यक्रमात गटविकास अधिकारी  उमेशजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. संध्याकाळी चार ते सहा या वेळेत विद्यार्थी कुठल्याही बंधनाशिवाय या वाचनालयातील पुस्तके वाचून  आपले ज्ञान अद्ययावत करणार आहेत.
      आजच्या हात  धुवा दिना निमित्त्याने  शाळेतील शिक्षक  मनोज  टापरे यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री दंडगव्हाळ यांनी केले, ज्येष्ठ शिक्षक विलास वाळेकर यांनी आभार व्यक्त केले. सोशल डिस्टंसिंग व मास्क  चा वापर याकडे लक्ष देऊन झालेल्या या  कार्यक्रमासाठी कृषी विस्तार अधिकारी श्री मोरे, पंचायत समितीचे कर्मचारी श्री. पिंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिलीप भोरकडे,  सदस्य श्री दत्तात्रय भोरकडे, श्री विनायक भोरकडे ग्रामसेवक श्री मच्छिंद्र देशमुख,  श्री शहादराव वाघ,  श्री बाबासाहेब खोकले,  श्री. प्रभाकर भोरकडे, केंद्रप्रमुख श्री रमेश खैरनार, बाभुळगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत जानकर, पारेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री पुंडलिक पवार. पिंपळगाव जलाल येथील शिक्षक श्री विलास वाळेकर, श्री मनोज टापरे, श्रीमती रेखा महाजन श्रीमती योगिता सोनवणे,  श्रीमती सोनाली शिंदे यांचेसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker