आपला जिल्हानाशिक 

तिखट हिरव्या मिरचीने या संकट काळात आणला गोडवा…

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

तिखट हिरव्या मिरचीने या संकट काळात आणला गोडवा…

नंदिता या वाणाची हिरवी मिरची दिड एकर शेतीमध्ये लागवड २५० ते ३०० क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा त्यातून खर्च वजा जाता १५ ते १८ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा

सचिन सोनवणे नाशिक अंदरसूल- येवला तालुक्यातील उत्तर पूर्व हा तसा दुष्काळ ग्रस्त भाग पण यंदा च्या परतीच्या पावसाने हाहाकार करून शेतकरी राजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला पण शेतकरी राजा डगमगला नाही आलेल्या परिस्थितीला सामोरे जात नवनवीन प्रयोग तो करतच असतो असेच काहीसे येवला तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल गावचे सहकार व शिक्षण महर्षी गोविंदराव नाना सोनवणे यांचे नातू अमोल सुभाषराव सोनवणे यांना लहानपणापासून शेतीची आवड आहे. आपल्या शेती मध्ये दरवर्षी पारंपारिक पिके कांदा, मका, बाजरी, कपाशी आदि. घेतली जातात परंतु या वर्षी अति पावसामुळे पारंपारीक पिकांना फाटा देत आपल्या कडील शेतीविषयक ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर एक अनोखा प्रयोग करत भाजीपाला पिका कडे वळत मिरचीची लागवड केली या तिखट हिरव्या मिरचीने या संकट काळात या तरूण शेतकऱ्याच्या जिवनात गोडवा आणला आहे. ऑगस्ट महिन्यात आपल्या दिड एकर शेतीमध्ये नंदिता या वाणाची हिरवी मिरची एका सरळ रांगेत बेड तयार करून त्यावरती मल्चिंग पेपर वापरून रोपांची लागवड केली तसेच पाणी सिंचनासाठी ड्रीपचा वापर केला आहे. मिरची लावलेल्या प्लॉटच्या बाजूने शेड नेटचा वापर केला आहे. या पिका साठी त्यांना अंदाजे अडीच ते तिन लाख रुपये खर्च आला आहे.

तसेच सध्या ७०००/- रुपये प्रति क्विंटल बाजारात या मिरचीला भाव मिळतो आहे. त्यांना या मधून उत्पादन २५० ते ३०० क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यातून त्यांना खर्च वजा जाता १५ ते १८ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. या उत्तम आलेल्या मिरची प्लॉट ला बघण्यासाठी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित शेतकरी बांधव सुभाषराव सोनवणे, बाळासाहेब पुंड, विजय सोनवणे, मकरंद सोनवणे, रामनाथ एंडाईत, केशव सोनवणे, काशिनाथ एंडाईत, कचरू गवळी, सुभाष सोनवणे, द्वारकानाथ सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, विलास गाडे, उज्ज्वल जाधव, योगेश जाने, गणेश सोनवणे, अल्ताफ खान, सचिन सोनवणे, चिंतामणी भालेराव, सुनिल पुंड

या वर्षीच्या सततच्या पावसामुळे पारंपारिक पिके कांदा, मका, बाजरी, कपाशी आदि घेणे शक्य नव्हते म्हणून भाजीपाला पिकाकडे वळलो व नंदिता मिरचीची लागवड दिड एकरात केली. तसेच सध्या ७०००/- रुपये प्रति क्विंटल भाव असून या मधून २५० ते ३०० क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. खर्च वजा जाता १५ ते १८ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की आपणही या सारखी पिके आपल्या शेतात घ्यावी – अमोल सुभाषराव सोनवणे, मिरची उत्पादक शेतकरी अंदरसूल

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker