आपला जिल्हाकोपरगाव कोल्हे 

संजीवनी अकॅडमीत सीबीएसई पॅटर्नचे इ. ११ वी, १२ वी वर्गांना मान्यता- मनाली कोल्हे ; शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सायन्स व काॅमर्सचे प्रवेश सुरू

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 1 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

संजीवनी अकॅडमीत सीबीएसई पॅटर्नचे इ. ११ वी, १२ वी वर्गांना मान्यता- मनाली कोल्हे 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सायन्स व काॅमर्सचे प्रवेश सुरू

कोपरगांव :- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  अतंर्गत २००५ साली संजीवनी अकॅडमी या सीबीएसई पटर्नच्या स्कूलची स्थापना झाली असुन या शाळेतील  इ. 10 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात राज्य व देश  पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आणि   शाळेने  पालकांची विश्वासार्हता  प्राप्त केली आहे. आता पालकांच्या व विध्यार्थ्यांच्या  मागणी नुसार ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना  दर्जेदार शिक्षण  देण्यासाठी संजीवनी अकॅडमीला सीबीएसई कडून इ. ११वी आणि १२ वीचे सायन्य व काॅमर्स शाखेचे  वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळाली असुन इ. ११ वीची प्रवेश  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी  माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


संजीवनी अकॅडमीमध्ये सी.बी.एस.ई. पॅटर्न अंतर्गत इ. ११ वी व १२ वी सायन्स आणि काॅमर्स विद्या शाखांना  परवानगी मिळाल्याबध्दल आणि सिनिअर सेंकंडरी स्कूलचा दर्जा प्राप्त झाल्याबध्दल सकूलमध्ये नुकताच माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे आणि संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संचालिका मनाली कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत अभिवादन सोहळा (सॅल्युटेशन सिरेमनी) साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम व इतर शिक्षक  उपस्थितीत होते.
पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, सायन्स शाखेतील विध्यार्थ्यांसाठी इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बाॅयलाॅजी, फिजिकल एज्युकेशन /काॅम्प्युटर सायन्स व मास मीडिया स्टडिज अशा विषयांचे  अध्यापन करण्यात येणार आहे. तर काॅमर्स शाखेतील विध्यार्थ्यांसाठी  इंग्रजी, इकाॅनाॅमिक्स, अकौंटन्सी, बिझिनेस स्टडिज, फिजिकल एज्युकेशन/काॅम्प्युटर सायन्स, बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन  व फायनांसिअल मार्केटस् मॅनेजमेंट असे विषय असणार आहेत. सीबीएसई पॅटर्न अंतर्गत आंतरराष्ट्रीय  पातळीवर बदलणाऱ्या  अभ्यासक्रमानुसार वेळोवेळी पुनररचना करण्यात येते. यामुळे विध्यार्थ्यांना  आधुनिक ज्ञान तर भेटतेच शिवाय  ते पुढेही आंतरराष्ट्रीय  पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षांसाठी संक्षम होतात. संजीवनी मध्ये जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्स्ड, नीट, अशा  स्पर्धा परीक्षांच्या तयारीचाही अंतर्भाव असणार आहे. त्यासाठी विध्यार्थ्यांना  कोठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि पालकांवरही आर्थिक बोजा पडणार नाही. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे हे संजीवनीच्या विविध विद्या शाखांमध्ये विध्यार्थ्यांना  व पालकांना भावनारी शिक्षण ण व्यवस्था राबवित आहेत. त्यातुन विध्यार्थी यशस्वी होत आहेत, आता सीबीएसई पॅटर्ननुसार इ. ११ वी व १२ वी सायन्स आणि काॅमर्सचे विध्यार्थीही हमखास यशस्वी होवुन आपले उत्तम करीअर घडवतील, सध्या प्रवेश  प्रक्रिया सुरू असुन विध्यार्थी  व पालकांनी यां संधीचा फायदा घ्यावा, असे सौ. कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker