आपला जिल्हानाशिक महाराष्ट्र

व्यापारी गाळे पाडल्याने 25 लाखांचे नुकसान; पोलिसात गुन्हा दाखल

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

येवल्यातील व्यापारी गाळे पाडल्याने 25 लाखांचे नुकसान; पोलिसात गुन्हा दाखल

सय्यद कौसर येवला – येथील हुडको वसाहतीतील व्यापारी गाळे मध्यरात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने पाडून 25 लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश म्हसू कोल्हे रा. हुडको वसाहत, येवला यांचे मालकीच्या हुडको वसाहतीतील अजिंक्यतारा व्यापारी संकुलातील 4 व्यापारी गाळे सचिन झुंबरराव गायकवाड (सचिन पाटील) रा. पारेगाव रोड, मोरे वस्ती, येवला याने गैरकायदा मंडळी जमवून जेसीबीच्या सहाय्याने शुक्रवारी, (दि. 23) मध्यरात्रीच्या सुमारास पाडले. यामुळे 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद प्रकाश कोल्हे यांनी शहर पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून सचिन गायकवाड (पाटील) याचे विरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार डी. एम. शिरूड हे करत आहेत. सदर गाळे पाडल्याने ऑटोमोबाईल, गॅरेज दुकानाचे अडीच लाख रूपयांचे, झेरॉक्स दुकानाचे एक लाख रूपयांचे, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय संस्थेचे मुद्रण मशिनरी, साहित्य व अजिंक्यतारा शिक्षण संस्थेच्या वस्तूंचे, दस्तऐवजांचे पाच लाख रूपयांचे, दुध डेअरी व सरकी ढेप दुकानाचे पन्नास हजार रूपयांचे तर 4 गाळ्यांचे 16 लाख रूपये असे एकूण 25 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे तसेच संबंधितांकडून कोल्हे यांना यापूर्वी दमदाटी केल्या गेल्याचेही सदर फिर्यादीत कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शहरात प्रथमच अशापध्दतीची घटना घडल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker