आपला जिल्हानाशिक महाराष्ट्र

राज्यातील व्यायामशाळा, कुस्ती मैदाने व स्पर्धा सुरु करण्याची मागणी 

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४     

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

राज्यातील व्यायामशाळा, कुस्ती मैदाने व स्पर्धा सुरु करण्याची मागणी 

सय्यद कौसर येवला – कोरोना संकटामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील तालीम, व्यायामशाळा, कुस्ती मैदाने व कुस्ती स्पर्धा लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना सदर निवेदन देण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेताना राज्य सरकारने राज्यातील व्यायामशाळा, तालीम, कुस्ती आखाडे आणि कुस्ती स्पर्धा यांचेवर देखील बंदी आणली होती. आता अनलॉकच्या दिशेने शासनाने पाऊल टाकले असले तरी अदयाप राज्यातील व्यायामशाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील तालमी, व्यायामशाळा तसेच कुस्ती आखाडे बंद ठेवल्याने राज्यातील पैलवान आपापल्या तालमीत केवळ बसून आहेत. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत असून कुस्ती आखाडे व कुस्ती स्पर्धा बंद ठेवल्याने पैलवान मंडळींना दररोजचा खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यातील व्यायामशाळा खुल्या करण्यास परवानगी दयावी, राज्यातील कुस्ती मैदाने भरविण्यास परवानगी दयावी अशी मागणी सदर निवेदनात  करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पैलवान एन. के. पाटील, पैलवान ग्रुप महिला नाशिक जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख आकाश मथुरे, नाशिक शहराध्यक्ष पंकज नागरे, येवला तालुकाध्यक्ष खंडू साताळकर, येवला तालुका संघटक संग्राम पाटोळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker