आपला जिल्हानाशिक महाराष्ट्र

येवला तालुका पोलिस ठाण्याची पुन्हा एकदा दमदार कामगिरी

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

येवला तालुका पोलिस ठाण्याची पुन्हा एकदा दमदार कामगिरी

कौसर सय्यद येवला – येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये रहाडी व खरवंडी गावांमध्ये एकाच रात्री बऱ्याच ठिकाणी चोर्‍या झाल्या होत्या. त्यामध्ये एका आरोपीला भारम येथे दोन दिवस व दोन रात्री सापळा लावून ताब्यात घेतले होते. त्याला ताब्यात घेताना अर्धा तास शेकडो लोकांसमोर पोलिसांची झटापट झाली होती. सपोनि राजपूत यांना सदर आरोपीने चावा देखील घेतला होता. तरी देखील सदर आरोपीला सपोनि राजपूत, पोलीस हवालदार सानप, सतीश मोरे, निकम, पिसाळ यांनी फिल्मी स्टाईलमध्ये निष्प्रभ करून ताब्यात घेतले होते. त्याने स्वतःचे नाव खोटे सांगितले होते.
तपासादरम्यान सदर आरोपी हा महाराष्ट्रामध्ये सन 2012 मध्ये गाजलेल्या दिवेआगार गणेश मंदिर रायगड येथील खून व दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सदर प्रकरणांमध्ये जन्मठेप झालेली होती व तो सन 2018 मध्ये रेल्वेमधून पोलिसांच्या ताब्यातून बेडी सहित पळून गेला होता.सदरच्या आरोपीवर संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बारा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा गुन्ह्यांमध्ये त्याने दरोडा टाकताना खून केलेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरू आहे.
येवला तालुका पोलीस ठाण्याच्या या कामगिरी बाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब नाशिक ग्रामीण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रशंसा केली आहे व पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मागील एक महिन्याच्या काळामध्ये येवला तालुका पोलिस ठाण्याची कामगिरी गुन्हे उघडकीस आणण्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत आहे. टीम येवला तालुका पोलीस ठाणे यांचे अतुलनीय कामगिरी बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
माननीय पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी येवला तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व टीमला  25 हजारांचे बक्षीस जाहीर केले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker