आपला जिल्हानाशिक 

येवला तालुक्याचे करणार नेतृत्व : राज्यातील ३०० आदर्श शाळांमध्ये निवड

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

 

येवला तालुक्याचे करणार नेतृत्व : राज्यातील ३०० आदर्श शाळांमध्ये निवड
अंदरसूल शाळा साकारणार राज्यस्तरीय ‘मॉडेल स्कूल

सचिन सोनवणे अंदरसूल : शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी राज्यात ३०० शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात येवला तालुक्यातील 236 शाळा मधून अंदरसूल येथील जिल्हा परिषद शाळा अंदरसूल मुली या शाळेची राज्यस्तरीय मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच प्रा सौ विनिता अमोल सोनवणे यांनी दिनांक 26 ऑक्टोबर 2020 च्या शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकान्वये दिली आहे .अंदरसूल येथील 1934 मध्ये स्थापना झालेली जिल्हा परिषदेची स्वतंत्र मुलींची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इ.१ ली ते ७ वी वर्ग आहे. शाळेची इयत्ता 3री च्या वर्गाच्या दोन तुकड्या असून इतर वर्गाची प्रत्येकी एक तुकडी आहे .इयत्ता पहिली ते सातवी चा पट 240 आहे. शाळेत मुख्याध्यापकासह 9 शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थीनी वक्तृत्व , वैयक्तिक नृत्य,काव्यगायन स्पर्धेत तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. ग्रामस्थांचे सहकार्य आणि उपक्रमशील, मेहनती शिक्षकांमुळे शाळेचा गुणवत्तेचा आलेख नेहमी वाढता आहे. शाळेस स्वतंत्र संगणक कक्ष, जलशुध्दीकरण यंत्र ,मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वृक्षारोपण LCD प्रोजेक्टर आदी सुविधा आहेत. या शाळेची नुकतीच राज्यस्तरीय आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड झाली आहे. शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत अंदरसूल कडून मुलींचे शौचालय, 3 काँप्युटर ,1 प्रिंटर, पाण्याच्या टाक्या, Led टी व्ही ,संपुर्ण शालेय रंगकाम अशी भरघोस मदत केली आहे तसेच शालेय आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे प्रस्तावित आहे जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून 1 Led टीव्ही प्रात झाला आहे निवडीबद्दल सरपंच विनिता सोनवणे उपसरपंच वैशाली जानराव गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे , विस्तार अधिकारी सुनिल मारवाडी , केंद्रप्रमुख कैलास रोडे, शालेय समिती अध्यक्षा चैताली गायकवाड उपाध्यक्ष गणेश कासार, सदस्य सुनिल देशमुख योगेश जहागीरदार सुवर्णा सोनवणे रामानाथ चिखले संदिप दारूंटे ज्ञानेश्वर सुर्यवंशी व आदींसह ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
येवला तालुक्यातून राज्यस्तरीय मॉडेल स्कूल म्हणून एकमेव निवड झालेली अंदरसूल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ व लोक सहभागातून मदत झाली आहे.

मॉडेल स्कूल..असे साकारणार
या आदर्श शाळांमध्ये शासनाकडून सुस्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गुणवत्तेसाठी पूरक वातावरण तसेच भविष्यात मुलांसाठी वाहतूक व्यवस्था आदीसह इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता केली जाणार आहेत. यातून हे मॉडेल स्कूल साकारले जाणार आहेत.

अंदरसूल जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक उत्साही व मेहनती आहेत. शासनाच्या या राज्यस्तरीय उपक्रमाची ते निश्चितच १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी करून मॉडेल स्कूल साकारतील असा आशावाद आहे. – मनोहर वाघमारे, गटशिक्षणाधिकारी, येवला.

जि. प.अंदरसुल मुली या शाळेची आदर्श शाळा म्हणून शासनाकडून निवड झाली ही गावासाठी खूप अभिमानाची बाब आहे .शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत अंदरसुल कडून शौचालय ,3 कॉम्पुटर ,1प्रिंटर , पाण्याच्या टाक्या ,Led टीव्ही ,संपूर्ण शालेय रंगकाम अशी मदत केली आहे शालेय आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे प्रस्तावित आहे तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा येवला तालुक्याचे आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मदतीने शाळेच्या विकासात तसेच आदर्श मॉडेल स्कूल साकारण्यात मदत झाली आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच तसेच सर्व सदस्य नेहमी तयार आहोत.
सरपंच प्रा.सौ. विनिता अमोल सोनवणे
अंदरसुल ग्रामपंचायत

राज्यातील 300 आदर्श शाळांमध्ये मॉडेल स्कूल येवला तालुक्यातून एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदरसुल मुली या शाळेची निवड झाली ही खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे . या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर राहील – मुख्याध्यापक,  बाबासाहेब बेरगळ जि.प.प्रा.शाळा अंदरसुल 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker