आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

पुण्याच्या कोरोना रुग्णासाठी कोपरगावचे संदीप कोयटे ठरले देवदूत 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

पुण्याच्या कोरोना रुग्णासाठी कोपरगावचे संदीप कोयटे ठरले देवदूत 

कोपरगाव मनिष जाधव – देशभरात आलेल्या कोरोनाचे संकटामूळे सर्वांचेच जानजीवन विस्कळीत झाले. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या कमी जास्त होतांना दिसत आहेत. रुग्णांसाठी लागणारे सुविधा , औषधे उपलब्ध करण्यासाठी नातेवाईकांना अनेक ठिकाणी धावपळ होत आहेत. नुकतेच पुण्यातील एका रुग्णाला प्लाझ्मा ची गरज पडतातच कोपरगावत सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असलेले विभागीय व कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी मागील महिन्यातच प्लाझ्मा डोनेशन केल्यामुळे त्या हाॕस्पीटलमध्ये कोयटेंची नोंद झालेली होती. अचानक एका रुग्णासाठी प्लाझ्मा गरजी पडल्यामुळे हाॕस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांचा संपर्क करुन प्लाझ्मा मागणी केली. योगायोग काल संदीप कोयटे हे देखील कामानिमित्त पुण्यातच असल्यामुळे त्या रुग्णासाठी लागणारे प्लाझ्मा देण्यास मोठी मदत कोयटेंच्या माध्यमातून झाल्यामुळे मोठे जीवदान मिळाले.

रुग्णांच्या मदतीसाठी धावुन जाणारे खरे रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. आजही विविध ठिकाणी प्लाझ्मा दानाची, रक्तदानाची खुप गरज असुन सर्वांनी मदत करावी असे आवाहन संदीप कोयटे यांनी देखील सोशल मिडीयाचे माध्यमातून केले आहे.

संदीप कोयटे यांनी कोरोना च्या कालावधीत देखील रुग्णांसाठी लागणारे रक्ताची आवश्यकता बघता रक्तदान शिबीर घेतल्यामुळे अनेक रुग्णांसाठी फायदेशीर ठरले. त्याचबरोबर जाहिर केलेल्या लाॕकडाऊन काळात हातावर कामकाज करणारे नागरिकांना उपासमारीची वेळ आली त्यावेळी देखील त्यांनी कोणताही विचार न करता त्यांना मदत करण्याचा निर्णय दोन तीन महिने आधार राहील असे किराणासह इतर साहित्य उपलब्ध करुन दिले आजही त्यापध्दतीची मदत देखील देण्यास मागेपुढे पाहत नाही. रुग्ण हा कोणत्याही जिल्ह्यातील असो मदत करणे आपली प्रथम जवाबदारी आहेत हे त्यांनी पुण्यातील रुग्णाला मदत करतांना दाखवुन दिले आहेत. संदीप कोयटे यांनी जवाबदारी घेवुन केलेल्या कामाचे कौतुकास्पद आहेत. आजची युवा पिढी जवाबदारीतुन बाजुला न जाता जवाबदारीने काम करत असल्याने देशात नक्कीच युवा शक्तीची मोठी संघटन दिसणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker