कोपरगाव महाराष्ट्र

कुंभारी देवस्थान ट्रस्टला ५ फुट ३ इंच साईंची मूर्ती भेट

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

कुंभारी देवस्थान  ट्रस्टला ५ फुट ३ इंच  साईंची  मूर्ती भेट

कोपरगाव समाधान भुजाडे – श्री श्री श्री १००८ प.पु.राघवेश्वरा नंदगिरी तथा उंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या राघवेश्वर देवस्थानला  यादव परिवाराने राघवेश्वर मंदिरास दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी त्यांचे मित्र सतीश नीलकंठ यांच्याकडे साईबाबा मंदिराबाबत आणि साईंची मूर्ती भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

आणि त्यांनी त्यांचे हैद्राबाद येथील  मित्र एस.गोपीकृष्णन यांचेशी चर्चा करून राघवेश्वर देवस्थानला साई बाबांची ५ फुट ३ इंच मूर्ती भेट दिली. साईबाबांच्या मूर्तीची कुंभारी येथे नव्याने बांधलेल्या साईमंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.या पवित्र ठिकाणी गोशाला असून जवळपास ५० गावरान गायींची देखभाल केली जाते. दक्षिणवाहिनी गोदावरी गंगेकाठी असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री अनेक दूरदूरचे भाविकांना सामर्थ्याची प्रचीती येत असते. धार्मिक अनुष्ठानाचे तपासाठी वंदनीय उंडे महाराजांचे मार्गदर्शनाखाली कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थान येथे भाविक नेहमी  दर्शनासाठी येत असतात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker