आपला जिल्हाकोपरगाव 

गरजूंच्या चेह-यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच आमचा दिवाळीचा आनंद – सेवा प्रतिष्ठाण 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात
गरजूंच्या चेह-यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच आमचा दिवाळीचा आनंद – सेवा प्रतिष्ठाण  
      कोपरगांवमध्ये ‘‘ आपलुकीची दिवाळी ’’  
कोपरगांव मनिष जाधव – आपली दिवाळी वंचित घटकांसोबत करून या सेवा प्रतिष्ठाणने केलेल्या केलेल्या या सामाजिक कार्यक्रमांचे कौतुक होत तर आहेच, मात्र गरजूंच्या चेहर्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच आमचा दिवाळीचा आनंद असल्याचे प्रतिपादन सेवा प्रतिष्ठाणचे प्रमुख सामजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी मत व्यक्त केले. कुटुंबाने व समाजाने नाकारंल अशा दिनदुबळया व असहाय्य नागरिकाबरोबर दिवाळी साजरी करुन सेवा प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन दिवाळी फराळ वाटप करण्यात आले त्याप्रसंगी आढाव बोलत होते.

गेल्या काही महिन्यापासुन देशभरात कोरोना संकट कोसळल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ, उद्योग व्यवसाय बंद झाले एकप्रकारचे जगच थांबले अशी परिस्थिती निर्माण झाली. या कालावधीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली त्यावेळी शासनाने, सामाजिक संस्था, मंडळांनी पुढाकार घेतल्याने मोठी मदत मिळाली. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र गोडधोड खाण्यासाठी केले जाते. घराची सजावट केली जाते. गोरगरिबांना व सामाजातील उपेक्षित घटकांना दिवाळी सणाचा आर्थीक परिस्थिती कमकुवत असल्याने आनंद उपभोगता येत नाही.
जाहिरात
नवीन कपडे, घर सजावट, गोडधोड या बाबी गोरगरिबांपासुन कोसो दूर असतात. हीच परिस्थिती डोळयासमोर ठेवुन कुटुंबाने व समाजाने नाकारंलेले अशा दिनदुबळया व असहाय्य नागरिकांची सेवा प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन ‘आपलुकीची दिवाळी’’ चा करण्याचा निर्णय घेवुन 150 निराधारांना दिवाळी फराळ वाटप करुन त्यांची दिवाळी गोड केली.
जाहिरात
आयोजित केलेला उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. फराळ वाटताना खरोखरच त्या गरिबांच्या चेहर्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होते दरवर्षी आपलुकीची दिवाळी उपक्रम कधीही खंड न पडता नियमित करण्यात येणार असल्याचे आढाव म्हणाले. प्रतिष्ठाणचे विशाल निकम, संतोष वढणे, दिनेश गाडेकर, अजिंक्य कदम, अभिषेक सपकाळ, गणेश आढाव, ओमकार वढणे आदिंनी उपक्रम यशस्वी करण्यात मोठे परिश्रम घेतले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker