आपला जिल्हाकोपरगाव 

ब्रम्हाकुमारीज कडून आध्यत्मिक दिवाळी संध्या कार्यक्रम उत्साहात

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

ब्रम्हाकुमारीज कडून आध्यत्मिक दिवाळी संध्या कार्यक्रम उत्साहात

 भारत में जितना त्योहारों को महत्व दिया जाता है! वह और कही नहीं – ब्रम्हाकुमारी वासंती दिदी

दिवाली एक ऐसा त्योहार है! जिसे पुरानेको तिलांजली देकर नये को स्विकारा जाता है… –

कोपरगाव परिसर -( सचिन सोनवणे नाशिक )प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला तर्फे दिवाळी संध्या कार्यक्रम दि.१५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४:०० वा पटेल कॉलनी येवला येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी येवला सेवा केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी नीता दिदी यांनी सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली त्या नंतर स्वागत नृत्य होऊन नाशिक जिल्हा सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदी यांनी दिपावली अध्यात्मिक रहस्य व तणाव मुक्त जीवन या वरती व्याख्यान दिले. यावेळी कोरोना योद्धा म्हणून पोलीस निरीक्षक येवला व त्यांच्या सर्व टीमचे राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदी यांच्या हस्ते तिलक लावून यथोचित सन्मान करण्यात आला.

जाहिरात

यावेळी कोपरगाव सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी सरला दिदी, नाशिक येथील द्वारका सेवाकेंद्राच्या ब्रम्हाकुमारी ज्योती दिदी, वणी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी अनिता दिदी डॉ लीना पटेल, अंदरसुल कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे सभापती मकरंद सोनवणे, कोटमगाव येथील विश्वस्थ भाऊसाहेब आदमने, दिलीप कोटमे, आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करून, ब्रम्हाकुमारी आणू दीदींनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker