आपला जिल्हाकोपरगाव 

दोनशे आदिवासींची कुटुंबांची दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाली गोड

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरातदोनशे आदिवासींची कुटुंबांची दिवाळी, पाडवा, भाऊबीज झाली गोड
येवल्यात खटपट युवा मंच तर्फे “एक वस्त्र मोलाचे” व “एक करंजी मोलाची” नाविन्यपुर्ण उपक्रम
येवला सय्यद कौसर – आनंदाचा तोटा नसलेला दिवाळी सण साजरा करायचा सगळेजण आपापल्या परिने बेत आखतात. परंतु आपल्या बरोबरच समाजातील दिनदुबळ्यांची दिवाळी कशी असते याचा विचार प्रत्येकाच्या मनात येतोच असे नाही. मात्र येवला येथील स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच तर्फे अध्यक्ष मुकेश लचके यांचे “कलासाध्य” निवासस्थानी वस्त्र व फराळाचे संकलन केंद्र उभारले. सलग तीन दिवस शहरातील नागरिक, तसेच कापड दुकानदार व दानशुर व्यक्ती शितलकला पैठणीचे संचालक दिलीप पावटेकर, सोनी पैठणीचे मालक श्रीनिवास सोनी, प्रसिध्द कापड व्यापारी सोमनाथशेठ हाबडे, जयंत पेटकर, विकास गायकवाड, जगदीश हाबडे, कैलास बकरे, विजय हाबडे, पुष्पाबाई सोनवणे, कृष्णा फरसाण, कैलास बकरे, महेश गंगापुरकर यांनी वस्त्र व फराळाचे तसेच सॅनिटायझर व मास्क देऊन सहकार्य केले. “एक वस्त्र मोलाचे” व “एक करंजी मोलाची” ह्या उपक्रमात विविध प्रकारचे कपडे त्यात महिलांसाठी साड्या, लहान मुलासाठी कपडे, फराळाचे पदार्ध असे विविध प्रकारच्या चीजवस्तू मोठ्या प्रमाणात जमा करून तब्बल दोनशे आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड केली.
जाहिरात
नाशिक जिल्ह्यात गाजलेला उपक्रम “एक करंजी मोलाची” या खटपट युवा मंच तर्फे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे हे 11 वे वर्ष असुन यंदाही हा उपक्रम कौतुकाचा मानकरी ठरला. येवला तालुक्यातील सायगांव फाटा परिसरात  झेपडपट्टीत (सेंदवा, मध्य प्रदेश येथील) सुमारे दोनशे आदिवासी कष्टकरी कुटुंबांना या उपक्रमाचा लाभा झाला. सदर उपक्रमामध्ये खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचा फराळ पिशव्यांमध्ये सिलबंद करून त्याचे पॅकेट केले तसेच  वस्त्रांची विगतवारी करून ते सुध्दा पॅकींग करून वाटप करण्यात आले. खटपट युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सामाजसेवेचे भान ठेवून दिपावलीचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी धडपड मंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके (सर) खटपट युवा मंचचे अध्यक्ष व आयोजक मुकेश लचके, प्रा.दत्तात्रय नागडेकर, पुरुषोत्तम रहाणे, आबा सुकासे, वरद लचके, संजय जेजुरकर, कृष्णा जेजुरकर, शरद कांबळे, दत्ता देशमुख, ज्ञानेश्वर कांबळे, गुलाब बदासे सेंदवा, राम तुपसाखरे, गोकुळ गांगुर्डे, श्रीकांत खंदारे, अमेाल लचके यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत होते. सायगांव येथील ग्रामस्थानी या नाविण्चयपुर्ण कार्यक्रमाबद्दल आभार मानून खटपट युवा मंचला धन्यवाद दिले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव
“विविध सामाजिक उपक्रम राबवित असतांना आपण दिवाळीचा आनंद लुटतो. पण या  आदिवासी कष्टकरी बांधवांकरिता दरवर्षी दिपावली निमित्त “एक वस्त्र मोलाचे” हा सामाजिक बांधीलकीतील उपक्रम राबविला जातो. नाविन्यपुर्ण उपक्रताचे हे 22 वे वर्ष आहे. सेवेत आम्हाला जो आनंद मिळाला तो शब्दांवाटे सांगु शकत नाही.. सहकाऱ्यांसह येवलेकरांचेही भरभरून सहकार्य मिळाले.”
मुकेश लचके , अध्यक्ष खटपट युवा मंच
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker