आपला जिल्हानाशिक 

प्रत्येक गावात ठक्करबाप्पा अंतर्गत निधी उपलब्ध करणार

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

प्रत्येक गावात ठक्करबाप्पा अंतर्गत निधी उपलब्ध करणार

येवला कौसर सय्यदयेवला तालुक्यामध्ये ठक्करबाप्पा चा आदिवासी विभागाकडून ०२ कोटी २० लाख रूपये निधी तालुक्यातील तीस गावांना झाला आहे. तालुक्यातील आदिवासी बांधवांना प्रथमच एवढा मोठा निधी प्राप्त झाला आहे पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी दहेगाव धूळ येथील सभामंडपाचे भूमिपूजन करताना सांगितले आदिवासी बांधवांना येवला तालुक्यामध्ये ठक्कर बापा अंतर्गत आतापर्यंत किरकोळ निधी उपलब्ध होत होता एखाद्या गावात कामाचा निधी उपलब्ध असायचा परंतू जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ तसेच विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार नरेंद्र दराडे शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्या आशीर्वादाने व पंचायत समितीच्या पाठपुराव्याने येवला तालुक्याला मोठा निधी प्राप्त झाला.
आदिवासी वस्तीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून एकही काम झाले नाही आत्ता सभामंडप पाण्यासाठीची सोय स्मशानभूमी यांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे आता आदिवासी वस्त्याही झळकण्यासाठी मदत होणार आहे असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले या सभामंडपा चा उपयोग आदिवासी बांधवांना आपले छोटे मोठे कार्यक्रम करण्यासाठी तसेच आपल्या लग्न समारंभ करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे या सभामंडप आदिवासी बांधवांचे मंडपाचा खर्च वाचण्यासाठी मदत होणार आहे येणाऱ्या काळात प्रत्येक गावात ठक्करबाप्पा अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन आदिवासी वस्ती मध्ये सुद्धा सर्व सुख करणार असल्याचा सभापती प्रवीण गायकवाड यांनी बोलताना सांगितले याप्रसंगी डॉक्टर सुरेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सभापती प्रवीण गायकवाड आदिवासी साठी मोठे काम उभे केले आहे वन जमिनीसाठी व त्यांचे पट्टे मिळवून देण्यासाठी नेहमी धडपड करत आहे.
जाहिरात
सभापती आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत आदीवासी कुटुंबांना रेशन कार्ड जातीचे दाखले घरकुले मिळवून देण्याचे काम सभापती कडून होत आहे सभापती कार्यालयाकडून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचं दालन नेहमी सर्वसामान्य माणसांनी भरलेलं असतं यातच त्यांची कामाची चुणूक दिसून येते अशा कामाच्या माणसाकडून समाजाने योजना पदरात पाडून घेतल्या पाहिजे असे डाँ. सुरेश कांबळे यांनी सांगितले. याप्रसंगी नवनाथ  घोडके, रमेश शेळके शिवाजी गाडे, आप्पा गायकवाड, दशरथ माळी सुरेश शिंदे, भाऊसाहेब गा

जाहिरात

तात्याबा पतंगराव ,अर्जुन माळी, सोमनाथ चौधरी ,भाऊसाहेब माळी ,सुभाष माळी विक्रम माळी, शंकर माळी, खंडू माळी, योगेश सोमासे यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब माळी यांनी मानले. या  गावांना झाला निधी मंजूर अंदरसुल अंगणगाव अंगुलगाव सोमठाणा जोश खिर्डीसाठे अनुकुटे एरंडगाव नेऊरगाव मानोरी खुर्द गुजरखेडा खैरगव्हाण नायगव्हाण बोकटे भाटगाव तांदुळवाडी देवळणे नांदूर निमगाव मढ विखरणी सावरगाव गोपालवाडी दहेगाव धूळ

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker