आपला जिल्हानाशिक 

कोरोनामुळे निर्माण झालेला विकासकामांचा अनुशेष नक्कीच भरून काढू – पालकमंत्री छगन भुजबळ

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

कोरोनामुळे निर्माण झालेला विकासकामांचा अनुशेष नक्कीच भरून काढू – पालकमंत्री छगन भुजबळ

येवला तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

कोपरगाव समाधान भुजाडे / मनिष जाधव – कोरोना विषाणूमुळे राज्यातील विकासकामांचा निधी आरोग्य, पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा या विभागाकडे वळविण्यात आला होता; मात्र आता रुग्णांची संख्या घटली आहे आणि हळूहळू राज्य शासनाने विकासकामे देखील सुरू केली आहे. उपलब्ध निधीतून विकासकामांचा अनुशेष नक्कीच भरून काढू, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

येवला तालुक्यात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, सरपंच वनिता सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात, माजी सभापती किसन धनगे, माजी सभापती प्रकाश वाघ, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, प्रांत अधिकारी सोपान कासार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उमेश पाटील, उपअभियंता देवरे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता विजय कोळी, उपअभियंता व्हि. के. पाटील यांचेसह संबंधित गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता; या लॉकडाऊनच्या कालावधीत शिवभोजन थाळी आणि अन्न धान्याचा पुरवठा नियमित करण्यात आला. या काळात राज्य शासनाने रात्रंदिवस मेहनत घेऊन जवळपास साडे बारा कोटी लोकांना याचा लाभ दिला. राज्याची आर्थिकस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन विविध योजनांचा माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाने जगात पुन्हा थैमान घातले असून अंदाजे पाच ते सहा पटीने अधिक रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

जाहिरात

आपल्या देशात देखील पुन्हा ही लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपले कुटुंब आपली जबाबदारी म्हणून एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी स्वतःसोबत इतरांच्या रक्षणासाठी मास्क वापरा, काही लक्षणे दिसल्यास लगेच उपचार घ्या, जेणेकरून आपण या कोरोनाला रोखू आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही.

राज्यातील जनता एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे शासकीय निकषांचे काटेकोर पालन करून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव राज्यात होऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात

शरीरातील कोमॉर्बिडीटी कमी करण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या कल्पनेतुन तयार झालेला ग्रीन ज्यूस सक्षम असल्याचेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील मुखेड येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत देवी मंदिराशेजारी सभामंडपाचे बांधकाम या कामाचे भुमीपुजन, मुलभुत सुविधा अंतर्गत सामाजिक सभागृहाचे बांधकाम या कामाचे उद्घाटन, स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी वस्तीत सभामंडपाचे बांधकाम या कामाचे उद्घाटन तसेच मुलभुत सुविधा अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे भुमीपुजन पार पडले. यासोबतच अंदरसुल येथे मुलभूत सुविधा अंतर्गत सैदुबाबा मंदिर ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळेपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण या कामाचे भुमीपुजन, मुलभूत सुविधा अंतर्गत बसस्टँड ते महात्मा फुले रस्ता कॉक्रिटीकरण या कामाचे भुमीपुजन, मुलभूत सुविधा अंतर्गत बल्लासपूरा येथे रस्ता कॉक्रिटीकरण या कामाचे भुमीपुजन, देवळाणे येथे मुलभूत सुविधा अंतर्गत गोरोबाकाका मंदिर सभागृहाचे भुमीपुजन, जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभुमी अनुषांगिक कामांचे लोकार्पण करण्यात आले. तर बोकटे येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण, जनसुविधा अंतर्गत दशक्रिया विधी शेड बांधकामाचे भुमीपुजन, जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी अनुषांगिक कामे, जनसुविधा अंतर्गत हनुमान मंदिर सभागृहाचे भुमीपुजन करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker