आपला जिल्हानाशिक 

सरपंचांच्या कार्यक्षमतेला ग्राम विकास अधिका-याच्या कल्पकतेची जोड

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

जाहिरात

सरपंचांच्या कार्यक्षमतेला ग्राम विकास अधिका-याच्या कल्पकतेची जोड

सचिन सोनवणे नाशिकग्रामपंचायत हद्दीत विकासकामे करताना भासणा-या निधीच्या अडचणीवर मात करत अंदरसुल ग्रामपंचायतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कल्पकतेने वापर करत गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित शाळेच्या संरक्षक भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे, अंगणवाडी इमारत बांधकाम करणे ही कामे पूर्ण केली. तर अजुनही इतर शाळांच्या संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या सार्वजनिक हिताचे सर्व नाविन्यपूर्ण कामे चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येणार आहे. 

या व्यतिरिक्त ग्रामपंचायत सभागृहाचे/प्रशिक्षण केंद्राचे सुशोभीकरण, सांडपाणी निचऱ्यासाठी भुमिगत गटारी, मुलांची जिल्हा परिषद ब्रिटिश कालीन शालेय इमारत नुतनीकरण, मुलींची जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्र राज्यात एक आदर्श शाळा म्हणून निवड, गावातील दोन्ही मोठ्या शाळांसह वाडी वस्ती वरील ११ शाळांना इ लनिँग सुविधा, अंगणवाडी इमारती मुलांना खेळण्यासाठी साहित्य, गावातील २० बंधारे खोलीकरण व रुंदीकरण हे उत्कृष्ट दर्जाचे कामकाज ग्रामपंचायतींने केले.

जाहिरात

सरपंच प्राध्यापक सौ विनिता अमोल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सौ वैशाली जनार्दन जानराव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या समन्वयातून कामकाज करताना अंदरसुल ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब बोराडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या उत्कृष्ट कामकाजाचा गौरव म्हणून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपल्या मतदारसंघाचे भाग्य विधाते मा ना आदरणीय भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते यांना सन्मानित करण्यात आले बद्दल सन्मानिय बोराडे भाऊसाहेबांचे हार्दिक अभिनंदन.

 

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker