आपला जिल्हाकोपरगाव महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन मराठा समाज होऊ देणार नाही – नितीन पटारे

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

हिवाळी अधिवेशन मराठा समाज होऊ देणार नाही – नितीन पटारे

कोपरगाव समाधान भुजाडे –  आज रविवार दि.२९ नोव्हेंबर रोजी मराठ्याचे क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील याचा आशीर्वादाने व अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील याचा आदेशाने अखिल भारतीय छावा संघटनेच्या उत्तर नगर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांचा हस्ते ११ शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

कोपरगाव येथील पुणतांबा फाटा व धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथे शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन पटारे म्हणाले कि, गाव तेथे शाखा या अभियानातर्गत उत्तर नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी ११ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जिथे होईल अन्याय तेथे धावुन जाऊ आम्ही…! जेथे होईल अंधार तेथे पेटून उठू आम्ही…! हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणार असे त्यांनी सांगितले, मराठा आरक्षणाला मा. न्यायालयाने स्तगीती दिली, स्तगीती दिल्यानंतर राज्यसरकारने शिक्षणामध्ये मराठा आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला याचा विरोधात गाव तेथे शाखा उभी करून मराठा समाजात जनजागृती करून मराठा आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढा तीव्र करत आहोत, येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मराठा समाज होऊ देणार नाही सरकार ला जाब विचारू.

जाहिरात

सरकारने शेतकर्यांना हमी भाव देऊन शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याच बरोबर हिवाळी अधिवेशना आधी शिक्षणातील आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर एकही शाळा, महाविद्यालय सुरु होऊ द्व्णार नाही असा इशारा देण्यात आला, यावेळी तालुकाध्यक्ष परिमल दवंगे, ता.उपाध्यक्ष प्रशांत वाकचौरे, ता.कार्याध्यक्ष नाना उगले, शहराध्यक्ष सागर सोमवंशी, उपशहराध्यक्ष महेश उगले, ग्राहकसंरक्षक संतोष मोरे, वाहतुकसेना प्रमुख संतोष भागिले व शेकडो पदाधिकारी, सभासद उपस्तित होते.

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker