पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठे संकट -डाॕ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिले संकेत
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मोठे संकट -डाॕ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिले संकेत
कोपरगाव (समाधान भुजाडे) – गेले काही महिन्यांपासुन देशभरात कोरोना या आजाराने चांगलेच कहर केल्याने अनेक नागरिक संकटात आले तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. काही महिन्यानंतर कोरोना चे वातावरण कमी झाले असे समजुन नागरिक बिनधास्त झाले आहेत. परंतु पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाटेत मोठे संकट राहणार असुन नागरिकांनी शासनाचे नीयमाबरोबर आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगावचे वैद्यकीय अधिकारी डाॕ. कृष्णा फुलसौंदर यांनी कोपरगाव परिसर ला दिलेल्या विशेष मुलाखतीत माहिती दिली.
कोरोना च्या वातावरणामुळे राज्यात पहिल्या पेक्षा अधिक परिस्थिती गंभीर होत चालेली आहेत. दिवाळी च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल केले नंतर नागरिकांचा संपर्क बाजारात जास्त प्रमाणात वाढला बाहेर गावी प्रवास, लग्न समारंभ, देव दर्शन असे विविध कारणाने लोकांमधील एकमेकांचा संपर्क दुप्पट झाल्यामुळे बाधित रुग्णांचा संपर्क अनेक नागरिकांशी आला त्याच बरोबर नागरिक देखील काळजी घेत नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची शक्यता वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविली आहे.

कोपरगाव तालुका हा कोरोनाला आळा घालण्यास जिल्ह्यात अग्रेसर होता. तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या अतिशय कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही मागील काळात अतिशय उत्तम होते. परंतु नोव्हेंबर महिन्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे.एकाच महिन्यात ३ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमविल्यामुळे पुन्हा तालुक्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की कोरोनाची दुसरी लाट येण्याचे मुख्य कारण नागरिकांचा निष्काळजी पणा ठरला आहे.सरकारने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लॉकडाऊन हे उठविले परंतु नागरिकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन वावरू लागले लॉकडाऊन संपले जणू काही कोरोनाच संपला अशा अर्थाने नागरिक समाजात वावरू लागले आणि त्याचाच परिणाम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट संपूर्ण राज्यावर उभे राहिले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मध्ये कोरोना रुग्णांमध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे लक्षणे समोर येत असल्यामुळे व प्रथमोपचार मध्ये निष्काळजी बाळगल्या मुळे रुगांचा जीव वाचविणे अतिशय कठीण बनत असल्याचे त्यांनी सांगितले.बाधित रुग्ण हा लक्षणं असले तरी तो अंगावर काढतो किंवा लोकल डॉक्टर यांच्या कडे धाव घेतो परंतु कालांतराने त्यांचे गंबीर स्वरुप वाढते आणि मग शेवटच्या क्षणी तो रुग्ण कोरोना उपचार संदर्भात कोविड सेंटरला भरती होतो परंतु त्यावेळेस रुग्णाच्या शरीरात विषाणूने गंभीर स्वरूप घेतलेले असते त्या मुळे त्याचा उपचार करणे कठीण होते आणि शेवटी रुग्णांची मृत्यू सोबत झुंज सुरू होऊन शेवटी तो पराभव होतो. म्हणून पुढील काळात रुग्णांन मध्ये थोडे जरी लक्षणे दिसले तर त्यांनी आपली कोरोना तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. व एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर लगेच त्यांनी आपली चाचणी करून पुढील उचार सुरू करावा जेणे करून त्याचे गंभीर स्वरुप होण्या अगोदरच रुग्णांला उपचार सुरू केला जाऊन त्याचा जीव वाचविता येऊ शकतो.व बाकी नागरिकांनी सकस आहार व व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी योग्यतो आहार घ्यावा जेणे करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व आपण निरोगी राहाल असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कोपरगांवकरांसाठी महत्त्वाचे सुचना
√ नागरिकांनी निष्काळजी पणाने वावरू नकातोंडाला मास्कचा वापर करा.√ वापरुन झालेला मास्क देखील इकडे तिकडे फेकुन न देता योग्य त्यांनी विल्हेवाट करावी.√ आपले हात सॅनिटायझरी ने अथवा साबणाने स्वच्छ धुवावे.√ पौष्टीक आहार सेवन करावे.√ व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचे सेवन करावे.√ शरीरात प्रोटिनचा आहावर जास्त प्रमाणात ठेवावा.√ नागरिकांनी सतर्क राहावे.√ प्रशासनास सहकार्य करावे.√ आपली गरज आपल्या घरच्यांना,गावाला, राज्याला, देशाला आहे.कोरोनाला पुन्हा कोपरगावकर हरवणार