आपला जिल्हानाशिक महाराष्ट्र

कोपरगाव, येवला, येथून मोटारसायकल चोरी केल्याची आरोपींनी दिली कबुली ; अवैध शस्त्र व रस्ता लुटीतील आरोपी गजाआड

संपादक मनीष जाधव कोपरगाव परिसर मोबा ९८२३७५२९६४ 

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

अवैध शस्त्र व रस्ता लुटीतील आरोपी गजाआड ; मोटारसायकल चोरांची टोळी पोलिसांच्या ताब्यात २० मोटारसायकल जप्त    

कोपरगाव,  मालेगाव, चांदवड, येवला, अहमदनगर, पाचोरा येथून मोटारसायकल चोरी केल्याची आरोपींनी दिली कबुली

सय्यद कौसर येवला – नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कार्यभार हातात घेताच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरवात केली असून येवला तालुक्यातील मोटार सायकल चोरांची टोळी तसेच अवैध शस्र व रस्ता लुटीतील आरोपींना ताब्यात घेण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी चोरीच्या मोटारसायकल कमी किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
जाहिरात
२५ नोव्हेंबर रोजी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील विखरणी येथील हसन उर्फ गोट्या रशिद दरवेशी (१९) याला ताब्यात घेतले त्याच्याकडे घराजवळ लावलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे मालेगाव येथील साथीदार खलील उर्फ कालू अहमद निहाल अहमद (३७) अनिस रहेमान अन्सारी (४२)गोल्डननगर मालेगाव यांच्यासह मालेगाव चांदवड येवला कोपरगाव अहमदनगर पाचोरा येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली यातील दोन आरोपींना मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले या तिन्ही आरोपींकडे मोटारसायकल चोरीचा सखोल तपास केला असता त्यांनी राजस्थान राज्यातील साथीदार रमजान मन्सूरी व सद्दाम मन्सूरी रा छपरा जि भिलवाडा यांच्या मदतीने जिल्ह्यातील बहुतांश भागात मोटार सायकल चोरल्याचे उघडकीस आले आहे यातील आरोपी व त्यांचे साथीदार विहीरीचे खोदकाम करण्यासाठी विविध ठिकाणी वास्तव्यास होते यातील आरोपी हसन उर्फ गोट्या दरवेशी व इतर दोघांच्या ताब्यातून ६ बजाज प्लॅटिना ४ हिरो एच एफ डीलक्स २ टी व्ही एस स्पोर्ट २ बजाज डिस्कव्हर २ स्पेडर १ बजाज सी टी १ हिरो आय स्मार्ट १ ड्रीम युगा १ व्हीकटर अशा २० मोटारसायकलची एकूण किंमत ४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जाहिरात
पोलिसांनी या आरोपीकडून विविध पोलीस स्थानकातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत यातील आरोपींच्या राजस्थान येथील साथीदारांचा पोलीस कसोशीने शोध घेत असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दुसऱ्या घटनेत येवला नांदगाव रोडवर एक संशयित इसम गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानुसार सरफराज खान महेबूब खान उर्फ सरू पहिलवान (३७) मोमीनपुरा येवला याच्या कब्जातुन गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब टिळे यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलीस स्थानकात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीनुसार पथकाने नवनाथ माधव कानफाटे रा संवत्सर ता कोपरगाव याला ताब्यात घेतले घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लुटीतील मोबाईल असल्याचे निष्पन्न झाले अधिक चौकशी केली असता जून महिन्यात येवला मनमाड रोडवर अनकाई बारी शिवारात एका रिक्षाला मोटारसायकल आडवी लावून मारहाण करत तीन मोबाईल व रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली त्याने दिली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार शांताराम घुगे रावसाहेब कांबळे इम्रान पटेल प्रवीण काकड भाऊसाहेब टिळे विशाल आव्हाड यांनी ही कामगिरी फत्ते केली.
येवला तालुक्यातील विखरणी परीसर गुन्हेगारांचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे सोने लूट घटनेतील आरोपी याच भागातील तर आता मोटार सायकल प्रकरणातही येथीलच आरोपी निष्पन्न झाल्याने विखरणी गुन्हेगारांचा अड्डा ठरू पहात आहे विखरणी येथे अवैध दारू तसेच वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून याला आळा घातल्यास गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकते जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker