आपला जिल्हापुणे 

०३ डीसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ०३ डीसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा

पुणे समाधान भुजाडे/ मनिष जाधव – ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उद्या दि. ३ डिसेंबर २०२० रोजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध मागण्यासाठी उद्या दि.३ डिसेंबर २०२० रोजी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मोर्चा काढण्यात येणार आहे.

जाहिरात

या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ हे करणार आहे. या मोर्चामध्ये जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी केले आहे.

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker