आपला जिल्हाकोपरगाव कोल्हे 

पंतप्रधानांचाच फोटो छापला जात नाही – साहेबराव रोहोम

संपादक मानिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

पंतप्रधानांचाच फोटो छापला जात नाही – साहेबराव रोहोम

कोपरगाव – देशातील प्रत्येक घटकाला हक्काचे घर देण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्न आहे, त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तळागळातील प्रत्येक घटकाला घर देण्याचे प्रयत्न करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थांपर्यंत ही योजना पोहचविण्याचे काम देशभर सुरू असतांना कोपरगाव विधानसभा मतदार संघात मात्र या योजनेसाठी केलेल्या आवाहन पत्रात पंतप्रधानांचाच फोटो छापला जात नाही, या प्रकाराचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत असल्याचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
देशातील नागरीक बेघर राहू नये या उदात्त हेतुने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांना घरे देण्याच्या योजनेला नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकाळात ख-या अर्थाने गती मिळाली. याचबरोबर देशात अनेक योजनांच्या अंमलबजावणीत प्रत्यक्षात जीवंतपणा आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे, करत आहे. मुख्यत्वे करून गरीबांना लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांचा वापर मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघात संवग लोकप्रियता मिळविण्यासाठी केला जात आहे. हे करीत असतांना मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोचे वावडे का , असा सवालही रोहोम यांनी केला.
जाहिरात
जाहिरात
गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात मतदार संघासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आणला नाही, केवळ माजी आमदार सौ कोल्हे यांच्या काळातील मंजुर झालेल्या कामांची पहाणी आणि उदघाटने करण्यात सध्याचे लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहे. त्यांनी मतदार संघासाठी निधी आणून आपली कार्यक्षमता सिध्द करावी, विशेष काही निधी मतदार संघासाठी मिळवून आणावा, पंरतु नागरीकांच्या हक्काच्या केंद्र सरकारच्या योजनांचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी करू नये,असेही श्री रोहोम म्हणाले.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker