आपला जिल्हामहाराष्ट्र
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow
X
Follow
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आॕनलाईन ख्रिसमस उत्साहात साजरा
कोपरगाव मनिष जाधव – प्रभु येशुंच्या शांततेच्या संदेशातून प्रेरणा घेउन नाताळ सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलने हा उत्सव यावर्षी अगळ्या वेगळया पध्दतीने साजरा केला. खरे तर आईवडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा असून सत्य हे मानवी जीवनाला परिपूर्ण बनविते, त्यामुळे सातत्याने सत्याचा अंगिकार करा अशी भावना यावेळी व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.

भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणांचा महत्वाचे स्थान आहे. या प्रत्येक सणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल मार्फत साजरे केले जातात. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीमुळे संजीवनी इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी आॕनलाईन नाताळ सण साजरा केला गेला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. शाळेमध्ये विविध कलाकृतींचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत हा सोहळा साजरा केल्याने आॕनलाईन अभ्यासाबरोबर आपले सणही आॕनलाईन पध्दतीने साजरा करतांना विद्यार्थ्यांचा आनंद निश्चितच द्विगुणीत झाला, यावेळी त्यांच्या पालकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी सौ कोल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल नेहमीच विद्यार्थ्यांच्या बौध्दीक कौशल्याला प्राधान्य देउन विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असते. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असते. आईवडीलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असुन सत्य हे मानवी जीवनाला परिपूर्ण बनविते. त्यामुळे प्रत्येकाने सत्याचा अंगिकार करावा असे सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या. संजीलनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे, यांनी संताक्लोज चे वेशभूषा करुन विद्यार्थ्यांना चाॕकलेट, खाऊ वाटप करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी संताक्लोज सोंबत “जिंगल बेल…जिंगल बेल ” गाणे म्हणत नृत्य केले तसेच यावेळी नाटक देखील सादर करण्यात आले.

तर स्कुलचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना नाताळ सणाची माहिती देवुन प्रोत्साहन दिले. शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे साहेब, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे, विश्वस्त माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याची प्रशांसा करुन मुलांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे सुञसंचालन कडु मॕडम, घुगरी मॕडम यांनी केले तर आभार संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
