आपला जिल्हामहाराष्ट्र

आगामी कोपरगांव नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅग्रेसचा झेंडा फडकविणार – रविंद्र साबळे 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

आगामी कोपरगांव नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅग्रेसचा झेंडा फडकविणार – रविंद्र साबळे 

कोपरगांव – आगामी होणा-या नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणुन नगरपरिषदेवर काॅग्रेसचा झेंडा फडकविणार असल्याची ग्वाही कोपरगांव काॅग्रेस अ.जा. विभागाचे शहरध्यक्ष रविंद्र साबळे यांनी नुकतेच पक्षाच्या झालेल्या आढावा बैठकीत दिली.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.सुधीरजी तांबे, आ.लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, संगमनेर न.प च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रदेश समन्वयक शिवाजीराजे जगताप, प्रदेश समन्वयक बंटी यादव, जिल्हाध्यक्ष अ.जा.विभाग राजेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसापूर्वीच काॅग्रेसच पक्षाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य ती दिशा देण्यासाठी दिनांक 2 जानेवारी रोजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी कोपरगांव काॅग्रेस अ.जा. विभागाचे शहरध्यक्षपदी रविंद्र साबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जाहिरात
मागदर्शन करतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून काँग्रेसच्या विचारांना जोडलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक पदाधिकारी तसेच कार्यकर्ता पोहचला पाहिजे आगामी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच अन्य निवडणुकांमध्ये चांगले यश मिळविण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येणा-या वर्षात होणा-या निवडणुका काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल,महाविकास आघाडी सरकार संपूर्ण राज्यात यशस्वी घोडदौड करीत असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस पक्षाला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार करून अन्यथा स्वबळावर लढण्याची संपूर्ण ताकद ठेवा असे शेवटी थोरात म्हणाले.
जाहिरात
याप्रसंगी रविंद्र साबळे म्हणाले की, गाव पातळीपासुन ते राज्य पातळीपर्यंत गोरगरिबांचे समस्या सोडवितांना राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.सुधीरजी तांबे यांनी विशेष मार्गदर्शन केल्यामुळेच जे शक्य नाही ते शक्य झाले आहे. माझ्यावर आगामी होणा-या निवडणुकीची दिलेली जवाबदारी मी पूर्णपणे स्विकारलेली असुन नगरपरिषदेत सर्वात जास्त जागा ताब्यात घेवुन काॅग्रेसचा झेंडा फडकविणार तसेच निवडणुकीत युवकांना संधी द्यावी अशी मागणी रविंद्र साबळे यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. यावेळी यादवराव त्रिभुवन, चंद्रकांत बागुल, सरिता विधाते, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker