आपला जिल्हाकोपरगाव 

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालया मार्फत आयोजित ‘रक्तदान’ शिबिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्दघाटन 

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालया मार्फत आयोजित ‘रक्तदान’ शिबिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्दघाटन

नाशिक – नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या कार्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या ‘रक्तदान’ शिबिराचे आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात करण्यात आले. यावेळी नियंत्रक शिधावाटप संचालक व ग्राहक वितरण कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक देखील केले.
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यामुळे नियंत्रक शिधावाटप संचालक व ग्राहक वितरण कार्यालयाने आपल्या सर्व कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे, उपनियंत्रक शिधावाटप ज्ञानेश्वर जवंजाळ,उपनियंत्रक शिधावाटप मनोहर कडवे, निरीक्षक किरण जामसांडेकर, निरीक्षक किरण सुर्वे, कल्याणी देसाई, सलमा खान, संदीप केणी हे उपस्थित होते.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी रक्तदान शिबिराची पाहणी केली व रक्तादान करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली व कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवडा भरून काढण्यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी सुरू केलेल्या ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी देखील कर्मचाऱ्यां सोबत रक्तदान केले तसेच रक्तादान केलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना श्री भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले.
जाहिरात
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker