आपला जिल्हाकोपरगाव 

ओगदी गावात चोरट्यांनी साधला डाव ; दगडी पाट्याने दरवाजा तोडुन तीन लाखाची चोरी ; आरोपी शोधकामी पथक रवाना

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *
जाहिरात

ओगदी गावात चोरट्यांनी साधला डाव ; दगडी पाट्याने दरवाजा तोडुन तीन लाखाची चोरी 

आरोपी शोधकामी पथक रवाना ; घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली भेट 

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील ओगदी या गावी शेतात राहणारे कमलबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष ४५ या घरी एकट्या असताना तीन अनोळखी इस्मानी दरवाजा तोडून जबरी चोरी केली.

सविस्तर वृत्त असे की ओगदी गावापासून बोकटा रोडया सुमारे लक्ष्मण जोरवर हे आपल्या पत्नी सह राहतात. शेती च्या विजेजी वेळ रात्री ची असल्याने ते रात्री पाणी भरण्यासाठी शेतात गेले आसता त्याची पत्नी घरात एकटी असल्याचे हेरून रात्री सुमारे १.४५ मी ने तीन अज्ञात इस्मानी घरासमोरील दगडी पाट्याने दरवाजा तोडत आत प्रवेश करून कमलबाई जोरवर यांना जबरी मारहाण करून सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने व काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

जाहिरात

अर्धा किलोमीटर वर प्रवेश केला व लाकडी दांड्याने गंभीर जखमी करून तीन लाखाचे दागिने रोख रक्कम जबरीने चोरून नेले आहे. या वेळी आरोपींनी दरोडा पडलेल्या घरापासून साधारणपणे १०० ते १५० फुटावर असलेल्या घराचा बाहेरून दरवाजा बंद करून ही चोरी केली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून.घटनास्थळी कोपरगाव ग्रामिण चे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या ताफ्या सह भेट देत घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी मागावर दोन पथके लागलीच रवाना केली आहे.जखमी महिलेला कोपरगाव शहरातील कोठारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे तर सदर महिलेचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker