पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार – पालकमंत्री छगन भुजबळ
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow

पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार – पालकमंत्री छगन भुजबळ
कोपरगाव मनिष जाधव / समाधान भुजाडे – नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, सातवा वेतन आयोगातील तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यात येणार असल्याचे श्री.भुजबळ यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करुन नाशिक येथील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सातवा वेतन आयोग हा शासकीय वेतनश्रेणीनुसार लागू होणार आहे. वेतन आयोग लागू होतांना कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बैठकित दिली.
