आपला जिल्हा

साधे जेवन चालेल, परंतु नाॅनव्हेज नको रे बाबा… ; बर्ड फ्लुच्या भितीचा ग्रामपंचायत उमेवादरांना होणार फायदा

सपांदक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

साधे जेवन चालेल, परंतु नाॅनव्हेज नको रे बाबा...
बर्ड फ्लुच्या भितीचा ग्रामपंचायत उमेवादरांना होणार फायदा

समाधान भुजाडे – सध्या सगळीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यापासुन कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा मानपान तसेच चहा पाणी, नाष्टा, जेवन आदि गोष्टी निवडणुकीत केल्याशिवाय निवडणुक आणि प्रचार पूर्णच होत नाही असे म्हणटले जाते, त्याच पध्दतीने यंदा निवडणुकीत पार्टी चे प्रमाण सर्वात जास्त असुन प्रचारासाठी अवघे चारच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराला जास्त गती मिळाली.

परंतु अवघ्या शेवटच्या टप्यात आलेला प्रचार दरम्यान अचानक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यापुढे बर्ड फ्लु चे संकट उभे राहिल्याने भितीपोटी कार्यकर्ते साधे जेवन चालेल, परंतु नाॅनव्हेज नको रे बाबा अशा भुमिकेत आल्याने स्थानिक नेत्यांना व उमेदवारांना फायदा होत असला तरी यात पोल्ट्री व्यापा-यांना आर्थीक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. याच दरम्यान आता बर्ड फ्लु या आजाराने लोकांची चिंता वाढविण्याची चिन्ह समोर येत आहे.

जाहिरात
जाहिरात
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker