आपला जिल्हाकोपरगाव 

तेंव्हा मात्र अॕड नितिन पोळ गप्पच होते

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे काम प्रगतीपथावर

कोपरगाव – नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमींना एकत्र करून प्रतिष्ठानची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेतली.प्राथमिक खर्चासाठी स्वतः आर्थिक मदतही केली. वर्षानुवर्षे एकत्र न येणाऱ्याना संघटित केले. चबुतरा भूमिपूजन कार्यक्रमात अडथळे आणले गेले तेंव्हा मात्र हे अँड नितिन पोळ महाशय गप्पच होते आता मात्र त्यांना कंठ फुटला आहे. गोडाऊनमधे असलेला पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यामुळेच होणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुकदेव जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हणटले आहे.

हे काम लवकर व्हावे यासाठी मी नगरपरिषदेच्या संपर्कात आहे. कोरोनाच्या काळात काम बंदच होते,ट्रॅक्टरची धडक बसली त्यात काही वेळ गेला.तुम्ही यासाठी किती वेळा नगरपरिषदेत गेले? तुम्हाला फक्त बातम्या देण्याचा उपद्व्याप करता येतो.उगाचच पत्रकबाजी करून प्रसिध्दी मिळविण्यासाठी कुणीही धडपड करू नये.

जाहिरात

प्रतिष्ठानची मिटिंग घ्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे,नगराध्यक्षांची नाही.आपल्यात तुम्हीच जास्त शिकलेले असून प्रतिष्ठानचे पदाधिकारीही आहात, तुम्ही मिटिंगसाठी आग्रह का नाही धरला?आधी याचा विचार करा मगच पत्रकबाजी करावी ही विनंती.श्री. विजय वहाडणे नगराध्यक्ष झाल्यानेच कामास चालना मिळालेली आहे,हे तरी मान्य आहे कि नाही? अनेक वर्षे गटबाजीमुळे अडचणी येत गेल्या,पण आता श्री.वहाडणे यांच्याच काळात कामाची पुर्तता होणार आहे याची सर्वांना खात्री आहे. आपण म्हटल्याप्रमाणे मागील नगराध्यक्षांनी पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून प्रयत्न केले हे आम्हाला मान्य आहे,परंतु त्या वेळेस तांत्रिक अडचणीमुळे मंजुरी मिळाली नाही,विद्यमान नगराध्यक्ष श्री विजय वहाडणे यांनी सर्व समाजाला एकत्र करून समिती गठीत करण्यासाठी मा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णा कृती पुतळा शहरात लवकरात लवकर बसवावा यासाठी फेर प्रस्ताव सादर करून शासन दरबारी अहोरात्र प्रयत्न केले.

जाहिरात

जिल्हाधिकारी यांचे दालनात पुतळा लवकरात लवकर बसवावा या मागणीसाठी विजय वहाडणे यांचे समवेत समाजाचे राजेंद्र बागुल, सोमनाथ अहिरे, नितीन साबळे, संजू पुंजा साळवे, संदीप निर्भवणे, अनिल जाधव इत्यादी समाज बांधव उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती स्मारक चे काम प्रगती पथावर असून शेवटच्या टप्प्या कडे चालू आहे हे समाज बांधव बघत असून तरी कोणीही चालू कामात खो घालण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला सुकदेव जाधव, संजय पुंजा साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपञकात म्हणटले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker