Follow
डिजिटल कौशल्य हीच भविष्यातील शक्ती – शशिकांत ससाणे
संवत्सर प्रतिनिधी – आपण एकविसाव्या शतकातील म्हणजेच डिजिटल युगातील करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास तयार आहात का ? मग तुम्ही MS-CIT कोर्स शिकायलाच हवा. या कोर्समध्ये दोनशे पेक्षा अधिक डिजिटल कौशल्ये जाणून घ्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळवुन भविष्यातील उज्वल करियर आणि जॉबसाठी सज्ज व्हा असे आवाहन संवत्सर येथील रामकृष्ण कॉम्प्युटर्सचे संस्थापक संचालक शशिकांत ससाणे यांनी केले आहे.

MS-CIT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करणाऱ्या अभ्यासक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात MKCL कडून सन २००१ मध्ये करण्यात आली. २१ व्या शतकात आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेला आहे. ज्ञानविस्ताराचे अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणून डिजिटलचे रूप (डिजिटलायझेशन), अनेक प्रकारच्या डिजिटल स्वरूपांच्या सहयोगाने उदयास आले. डिजिटली साठविणे, डिजिटली सादरीकरण, डिजिटली वितरण, डिजिटली प्रवेश (एक्सेस), डिजिटली संग्रहित करणे आणि डिजिटल व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सुलभ झाल्या.
साहजिकच खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येकाला या सर्व गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. २१ व्या शतकात जगण्याच्या पद्धतीमध्ये असा एक क्रांतिकारी बदल होऊन, माहिती तंत्रज्ञानाची जागरूकता, साक्षरता, कार्यक्षमता आणि उपयोगितेमुळे सर्व सामान्यांमध्ये असलेली डिजिटल संदर्भातील दुफळी, परिणामकारी ज्ञान व प्रगतीच्या संधी यांच्यामध्ये एक सेतू निर्माण झालेला आहे. २१ व्या शतकात प्रत्येकाला नोकरीची तयारी करण्यात सकारात्मकता निर्माण करणे, समाजात योग्यरीतीने वावरणे आणि आत्मविश्वासाला चालना देण्यात हा अभ्यासक्रम यशस्वी झालेला आहे.
आता एकविसाव्या शतकातील डिजिटल कौशल्ये शिका कोठूनही आणि कधीही कारण MS-CIT कोर्स तुमच्यापासून फक्त एक क्लिक दूर आहे.
• एमकेसीएल ई लर्निंग रेव्होल्यूशन ( ERA )
• ई लर्निंगवर आधारित स्वयं-शिक्षण
• सरावासाठी भरपूर प्रॅक्टिकल
• प्रमाणित प्रशिक्षकांकडून शिकण्याची सुविधा
• शैक्षणिक संवाद, मूल्यांकन आणि सहयोग
• हा कोर्स आपली सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवतो
• उच्च गुणवत्तेच्या सचित्र पुस्तकाद्वारे वाचणे आणि समजून घेणे परिणामकारक होते.
आपल्या घराजवळील परीसरात असलेल्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये किंवा घरी स्मार्टफोनवरून यापेक्षाही सोपे म्हणजे आपल्या घरात असलेल्या कॉम्प्युटरवरुन देखील MS-CIT कोर्स पूर्ण करू शकता कोर्स बाबत आधिक माहिती व फायदे जाणुन घेण्यासाठी त्वरीत संपर्क करा संपर्क 9420793305, 9921381401 या नंबरवर संपर्क करा असे आवाहन रामकृष्ण कॉम्प्युटरचे संस्थापक संचालक शशिकांत ससाणे यांनी केले आहे.