ब्राम्हणगाव येथे शिवजयंती निमित्ताने वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन – सोमनाथ डफाळ
संपादक मनिष जाधव 9823752964
Follow
ब्राम्हणगाव येथे शिवजयंती निमित्ताने वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन – सोमनाथ डफाळ
मनिष जाधव कोपरगाव –कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षरोपण उपक्रम दि १९ फेब्रुवारी २०२१ ब्राम्हणगाव बाजारातळ येथे सकाळी ८ वा. आयोजित केला असल्याची माहिती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांच्यासह विक्रांत आसने उपअध्यक्ष ,गणेश्री डफाळ सचिव , बाळासाहेब सोमासे खजिनदार ,सुनील फापाळे , गणेश डोळे ,महेश मगर यांनी दिली.

कोविडच्या काळात रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे काळाची गरज लक्षात घेवुन रक्तदान शिबीर आयोजित केले असुन जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन देखील संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर दिवसंदिवस निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी लक्षात घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार देखील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने केलेला आहे.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करूया आपल्या क्षेत्रात एक तरी झाड लावू या असे आवाहन देखील यानिमित्ताने करण्यात आले निसर्गाला मानवा ला खूप काही देत असतो याचे भान ठेवून निसर्गाचे देणे आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून वृक्षारोपणाचे देखील आयोजन करण्यात आली आहे तरी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.